Breaking News

दोन वेळा कॅन्सर, हृदयविकारानेही गाठले : अभिनेत्री ऐंद्रिला शर्मा व्हेंटिलेटरवर

अभिनेत्री ऐंद्रिला शर्माला मंगळवारी हृदयविकाराचे अनेक झटके आले. सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. तिची तब्येत अचानक बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ऐंद्रिला शर्माला हावडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला अचानक स्ट्रोक आल्याने मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या. त्यानंतर अभिनेत्रीला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. शर्माने कॅन्सरसारख्या घातक आजाराशी दोनदा लढाई जिंकली आहे.

एद्रिया शर्माला दुसऱ्यांदा कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हाही तिने हार मानली नाही. तिला केमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर ती त्यातून पूर्णपणे बरी झाली. ऐंद्रीला शर्मानेही पुन्हा अभिनयाला सुरुवात केली होती. पण आता अभिनेत्रीची तब्येत पुन्हा बिघडली. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबासह चाहते ही चिंतेत आहेत.

ऐंद्रिला शर्माने अनेक बंगाली चित्रपटात काम केले. तिने झूमर या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. ती अनेक चित्रपट, सिरीयल आणि OTT प्रोजेक्टवर देखील काम करीत होती.

About विश्व भारत

Check Also

देशातील अर्धी जनता शारीरिकदृष्ट्या ‘अनफिट’

या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहार आणि नियमित व्यायाम करत नसल्यामुळे …

करीना के नौजवान के साथ मजे : सैफ अली खान का दम हुआ खत्म?

सैफ अली खान में शायद दम खत्म हो चुका है यही वजह है कि बेबो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *