Breaking News

स्वतः ला आनंदी कसे ठेवाल ? फार्मुला वाचा

Advertisements

आनंद कुठे मिळतोय, माहित आहे का…तुमची जी सर्वस्वी धडपड सुरु आहे, ती आनंद मिळविण्यासाठीच. तर हा आनंद कसा आणि कुठून घ्याल… वाचा

Advertisements

आनंदी राहण्यासाठी काही विशेष अटी असाव्यात, तरच आपण आनंदी राहू शकतो, असे तुम्हालाही वाटते का? पण तसे नाही. काही सवयी अंगीकारल्या तर आपण नेहमी आनंदी राहू शकतो. काही वैज्ञानिकांनी पद्धत सांगितली आहे.

Advertisements

✳️हळू,खोल श्वास घ्या

अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, हळू आणि खोल श्वास घेतल्याने तणाव कमी होतो. डोळे बंद करा. चांगल्या स्मृती किंवा ठिकाणाची कल्पना करा. नाकाने हळूहळू दीर्घ श्वास घ्या. तोंडाने किंवा नाकाने हळूहळू श्वास सोडा. हे पुन्हा पुन्हा करा. हळू श्वास घेण्यास त्रास होत असेल तर श्वास घेताना व सोडताना मनात पाच अंक मोजा.

✳️१० मिनिटे व्यायाम,खेळ

१० मिनिटांचा व्यायामही तणाव आणि चिंता कमी करू शकतो. आत्मविश्वास वाढतो. रात्रीच्या जेवणानंतर रोज फिरायला जा. दिवसाची सुरुवात ५ मिनिटे स्ट्रेचिंगने करा. नाचणे, क्रिकेट खेळणे, बॅडमिंटन सारखे कोणतेही आवडते उपक्रम सुरू करा.

✳️संगीत ऐका व चवीने अन्न खा

अन्न विविध प्रकारचे हार्मोन्स सोडते, त्यामुळे मूडदेखील सुधारतो. एकदल धान्य आणि भाज्यांमध्ये जटिल कर्बोदके असतात. ते सेरोटोनिन हा फीलगुड हार्मोन सोडतात. उच्च प्रथिनेयुक्त पदार्थ नॉरपेनेफ्रिन सोडतात.त्यामुळे ऊर्जा आणि एकाग्रता वाढते.तसेच आवडीचे संगीत ऐका… मग ते जे मन प्रसन्न करणारे असो.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उन्हाळ्यात कूल, हायड्रेटेड राहण्यासाठी कोणते फळ फायदेशीर?लिंबू पाणी, आंबा, ताक आणि…!

उन्हाळ्यात अनेकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवू लागली आहे. या सीझनमध्ये खाण्या-पिण्यात थोडासाही बदल झाला तरी त्याचे …

शरीर मे भरपूर रक्त बढाने और सेहत के लिए गुणकारी है लाल-लाल और हरे टमाटर

लाल या हरा टमाटर ऐसी सब्जी है जो सभी मौसम में बाजारों में मिलता है। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *