भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित स्थळे व बुद्धिस्ट स्थळांचा समावेश असलेल्या पर्यटन सर्किटचा शुभारंभ शनिवारी झाला. मात्र औरंगाबाद शहरातील बौद्ध लेणी व जागतिक वारसास्थळाचा दर्जा प्राप्त असलेले वेरूळ, अजिंठा येथील बौद्ध लेण्यांचा या सर्किटमध्ये समावेश करण्याचा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना विसर पडला आहे. तर नागपुरातील दीक्षाभूमीचा यात समावेश करण्यात आलाय.
औरंगाबादेतील मिलिंद कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पर्यटन सर्किटमध्ये समावेश करण्यात आला. मात्र, विद्यापीठाजवळील बौद्ध लेणींचा पर्यटन विभागाला विसर पडला आहे. औरंगाबादपासून ३० किमीवर वेरूळमध्ये एकाच ठिकाणी हिंदू, बौद्ध, जैन लेणी आहेत. तसेच अजिंठा लेणी ३१ बौद्ध लेण्यांचा समूह आहे. जागतिक वारसास्थळ असलेल्या या दोन्ही ठिकाणांकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
५ विभागांतील स्थळांचा समावेश
✳️मुंबई : चैत्यभूमी, राजगृह, डॉ. आंबेडकर भवन, बीआयटी चाळ, डॉ. आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स कॉलेज, वडाळा.
✳️कोकण : चवदार तळे, गांधारपाले पाल लेणी
✳️पुणे : सिम्बायोसिसमधील संग्रहालय, तळेगावचे नविासस्थान, भीमा कोरेगाव स्तंभ.
✳️नागपूर : दीक्षाभूमी, शांतविन वस्तू संग्रहालय, नागलोक, ड्रॅगन पॅलेस, कामठी.
✳️नाशिक : पांडव लेणी, त्रिरश्मी बौद्ध लेणी, मुक्तिभूमी स्मारक, काळाराम मंदिर.