Breaking News

दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवे ‘कलेक्टर’

Advertisements

छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांचा जिल्ह्यात चार वर्षांच्या आसपास कार्यकाळ झालाय. महापालिका आणि जिल्हा प्रशासनातील कार्यकाळाचा विचार करता त्यांची निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदली अपेक्षित आहे. सध्या पाण्डेय प्रशासकीय प्रशिक्षणासाठी मसुरीला गेले आहेत. त्यांच्या जागेवर बदलून येण्यासाठी एमएमआरडीएचे सहसचिव दीपक सिंघला, सोलापूर जि. प.चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (सध्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत), सिडकोला मुख्य प्रशासक या पदावर बदली हाेऊनही अद्याप रुजू न झालेल्या भाग्यश्री विसपुते यांच्या नावांची चर्चा होती.

Advertisements

 

गेल्या आठवड्यातील राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्या यादीमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव नव्हते. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये राहुल गुप्ता यांची महावितरण सहव्यवस्थापकीय संचालकपदासाठी बदली केली आहे. दोन दिवसांपूर्वी गुप्ता यांचे नाव शर्यतीत होते. २०१७ च्या बॅचच्या सनदी अधिकारी विसपुते यांची बदली गेल्या आठवड्यात सिडको मुख्य प्रशासकपदी झाली आहे; परंतु त्यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही. त्यांचे नाव जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी लावून धरले असल्याचे समजते.दिलीप स्वामी यांचेही नाव चर्चेत आहे; परंतु त्यांच्या नावावर नेत्यांचे एकमत दिसत नाही. दीपक सिंगला यांनी जलसंधारण आयुक्त म्हणून काम केले आहे. ते थेट आयएएस असून, विसपुते यांच्यापेक्षा सिनिअर आहेत. मात्र यामध्ये स्वामी यांनी बाजी मारली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची समाज माध्यमावर बदनामी केल्याप्रकरणी माजी नगरसेवक बलराम डोडानी व अन्य …

शराब से भरा सरकार का खजाना…!

शराब से भरा सरकार का खजाना…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट छिन्दवाड़ा- शराब दुकानों के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *