Breaking News

नागपुरातील ‘ओयो’हॉटेलमध्ये ‘सेक्स रॅकेट’ : अल्पवयीन मुली…

Advertisements

नागपुरातील मोठमोठ्या ‘ओयो’ हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात १५ वर्षांच्या मुलीला देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (५५) आणि मुलगा आशिष राकेश चावला (रा. छत्रपती चौक) यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Advertisements

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे सुरु असून त्याला पोलीस आणि गुन्हे शाखेचे एसएसबी पथकातील कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण सहकार्य आहे. त्यामुळे मनिषनगर परिसरातील अनेक हॉटेल्स आणि ओयो हॉटेल्समध्ये देहव्यापार पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरु असल्याचे समोर आले आहे. मनिषनगरातील श्रीजी ऑटोमोबाईल्सजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळील कृष्णकुंज ओयो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना आंबटशौकीन ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती होती. हॉटेल मालक राकेश चावला आणि आशिष चावला हे दोघेही बापलेकांनी काही अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलविण्याच्या कामासाठी तिघांना ठेवले होते. व्यवस्थापक धीरज रविंद्र खुळे (राकेश लेआऊट), गजानन रामहरी सोनवणे (४०, अमर संजय सोसायटी, मनिषनगर) आणि अलोक राजेंद्र रैकवार (सिद्धिविनायक मंदिरजवळ,रमानगर) या तिघांनी ८ ते १० तरुणी आणि अल्पवयीन मुलींना ओयोमध्ये ठेवले होते. तेथे आंबटशौकीन ग्राहकांना ५ ते १०हजार रुपये घेऊन मुली उपलब्ध करून देत होते. मात्र, मुलींना ५०० ते हजार रुपये देऊन त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करण्यात येत होते.

Advertisements

 

एसएसबी पथक देहव्यापाराच्या अड्ड्यांवर कारवाई करीत नसल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक श्याम सोनटक्के, सहायक निरीक्षक अयुब संदे, अविनाश जायभाये यांच्या पथकाने मनिषनगरातील श्रीजी ऑटोमोबाईल्सजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळील कृष्णकुंज ओयो हॉटेलवर छापा घातला. १५ वर्षाच्या मुलीला ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे सुरु आहेत. एसएसबी पथकातील काही कर्मचाऱ्यांचे थेट सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. एसएसबी पथकात जुनेच कर्मचारी असल्यामुळे छापा घालण्याचा धाक दाखवून संबंध ठेवण्यात काही कर्मचारी पटाईत आहेत. डीबी पथक आणि गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाचे कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने देहव्यापाराचे अड्डे सुरु असल्याची चर्चा आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

शिक्षा सुनावताच कोर्टातच कोसळला क्रिकेटपटू

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कॉमेन्ट्रेटर मायकल स्लॅटर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जवळपास डझनभर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *