Breaking News

वृक्षारोपण घोटाळा : मुख्य अभियंता घोगरे यांचे दोषींना अभय : मराठवाड्यातील अपंग जलप्रकल्पांची व्यथा

औरंगाबाद जिल्ह्यात जलसंपदा विभागाने वृक्षारोपण घोटाळा केला आहे. यात अभियंता गोडसे यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे,रउफ पटेल यांनी केला आहे. दोषी व भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय देणाऱ्या जलसंपदाचे मुख्य अभियंते विजय घोगरे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रउफ पटेल यांचा पाठपुरावा कायम सुरु आहे. त्याविषयी सध्या मराठवाड्यातील जलप्रकल्पांची काय स्थिती आहे, याचा घेतलेला आढावा…

मराठवाड्यातील जलप्रकल्प हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे. राज्यात सर्वात जास्त प्रकल्प असूनही शेतकरी आत्महत्या प्रदेश ही मराठवाड्याची ओळख…!
अवर्षण, अवकाळी व अतिवृष्टी हे निसर्गकोप पाचविलाच पुजलेला हा भाग आहे.

मानवनिर्मित संकटांचे का?👇

शेकडो खेडी ७५ वर्षानंतरही साध्या पिण्याच्या पाण्यावाचून तडफडणारी… !मायबहीणीच्या डोईवरचा हंडा उतरेना पण गळ्याभोवती फास घेवून जीवन संपविण्याची हतबलता…!शहरं सुद्धा तहानलेलीच पण पाणी खरेदीची क्षमता असलेली माणसांची…!पाणीदार नेतृत्व व पाणीदार प्रशासकांचा दुष्काळ हेच खरं कारण…” भर अब्दूल्ला गुड थैलीमे …या मानसिकतेतून पाण्यावरचं लोणी खाणारी मोठमोठी माणसं…पण पाझर फुटेना हे कटूसत्य….!

हे प्रकल्प अपूर्ण👇

जलव्यवस्थापन हे कागदोपञी व अपंग जलप्रकल्प हेच खरं दुःखं….!औरंगाबाद जिल्ह्यातील खेर्डा , वाकोद, टिटवी , बनोटी, देवगांव रंगारी, नांदूर मधमेश्वर , शिवना टाकळी , ब्रह्मगव्हाण भाग -१ व भाग -२ ….या प्रकल्पांचे काम कधी पुर्ण होणार…?निल्लोडला उजवा कालवा, चारनेरला डावा आणि रावळ्याला उजवा कालवा कधी होणार …?जालना जिल्ह्यातील २५ वर्षापूर्वी निविदा झालेले खोराड सावंगी , बरबडा, सोनखेडा , हतवण हे प्रकल्प कधी पुर्ण होणार की नाही…मराठवाड्यातल्या जलप्रकल्पांची यादी खूप मोठी आहे. विष्णूपुरी उपसा सिंचन योजना पुर्ण होवूच शकली नाही….शेवटी बॅरेजेस बांधली…!वितरीका पुर्ण करून जलव्यवस्थापन शेतकर्‍यांकडे २००५ च्या ऐतिहासीक कायद्यानुसार देण्यासाठी पाणी वापर संस्था का झालेल्या नाहीत…?

….अपंग लेकरं जन्माला घालायची जलव्यवस्थापनाकडे केवळ कागदोपत्री द्यायची…व सिंचन कृती आराखड्यात मनमानी करून कागदोपत्री देखभाल दुरूस्ती दाखवून तुंबडी भरणार्‍यांना कशाचेच काही का वाटेल…?

भुसंपादनाचा मोबदला अडकला👇

भूसंपादनात वाढीव मावेजा ही तर आणखी पर्वणी …अधिकार्‍यांसाठी…!दररोज नविन टेंडर काढून नवजलप्रकल्प जन्मास घालणार्‍यांना या अपंग जलप्रकल्पांचे,मराठवाड्याच्या हक्काच्या न साठणार्‍या पाण्याचे व मृत्यूला कवटाळणार्‍या बळीराजाचे कोणांसही कांहीही देणेघेणे नाही…!वातानूकुलीत चेंबरमध्ये संगणकाने काढलेल्या नकाशांवर निळा रंग म्हणजेच जलसाठा …व हिरवा रंग म्हणजेच उभी पिकं…या मानसिकतेने घात केला आहे …!जल चळवळ उभी राहत नाही…किंबहूना होऊच दिली जात नाही म्हणून हे वाढत्या क्रमाने वाढते आहे….!भरून येणारं आभाळही हतबल झालंय…दोन थेंब डोळ्यांतले मुकाट्याने बघतेय…!औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीक नुकसानीचे अनुदान मिळालेले नाही. यासाठी महसूल प्रशासन गप्प आहे. लोकांचे हाल करण्यात अधिकाऱ्यांना मोठं सुख मिळत आहे. काही अधिकारी आणि कर्मचारी वाळू माफिया झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यात त्यांना वेळच नाही, अशी उपरोधीत टीका नागरिक करीत आहेत.

About विश्व भारत

Check Also

भ्रष्टाचाराचे आरोप असताना तहसीलदाराला निलंबित करता येणार नाही : महसूल मंत्री बावनकुळे असं का म्हणाले?

तहसीलदार विनीता लांजेवार यांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यांला मॅटने स्थगिती दिली. …

महसूल मंत्री लक्ष देणार काय? रेती तस्करांवर लक्ष ठेवणाऱ्या चेकपोस्टना कुलूप

सहा जिल्ह्यातील रेती व इतर गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी नागपूर विभागीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *