Breaking News

सन्नी देओलची बॉबी देओलला मारहाण! वाचा…!

Advertisements

अभिनेता सनी देओल त्याच्या आगामी ‘गदर 2’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. बऱ्याच वर्षांनंतर या चित्रपटात प्रेक्षकांना सनी देओल आणि अमीषा पटेलची जोडी एकत्र पहायला मिळणार आहे. 23 वर्षांनी ‘गदर’चा सीक्वेल प्रदर्शित होतोय. नुकतंच सनी देओलचा मुलगा करण देओलचं लग्न पार पडलं. या लग्नसोहळ्याला संपूर्ण देओल कुटुंब उपस्थित होतं. करणच्या संगीत कार्यक्रमात देओल कुटुंबातील विविध सदस्यांनी धमाकेदार डान्ससुद्धा केला होता. सनी देओलसोबतच त्याचा छोटा भाऊ बॉबीनेही या कार्यक्रमात पत्नीसोबत रोमँटिक डान्स केला होता. सनी आणि बॉबी यांच्यातील बाँडींग सहज पहायला मिळते. मात्र या दोघांचा एक किस्सा क्वचितच कोणाला माहीत असेल. आपल्या अँग्री मॅनच्या अंदाजासाठी ओळखला जाणाऱ्या सनी देओलने एकदा बॉबी देओलला मारलं होतं.

Advertisements

सनी देओलने मोठ्या पडद्यावर जरी रागीट भूमिका साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात तो खूप शांत आहे. मात्र बऱ्याच वर्षांपूर्वी अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे त्याचा संयम सुटला. बॉबीवर तो इतका रागावला होता, की रागाच्या भरात त्याने छोट्या भावाला खूप मारलं. सनी आणि बॉबीने बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘यमला पगला दिवाना’. यामध्ये दोघांचे वडील धर्मेंद्रसुद्धा झळकले होते. या चित्रपटाचे दोन भाग आहेत.

Advertisements

2018 मध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा दोघंही कलाकार त्याचं जबरदस्त प्रमोशन करत होते. त्यादरम्यान एका रिपोर्टरने सनी देओलला हा प्रश्न विचारला की, त्याने कधी छोटा भाऊ बॉबीवर हात उचलला होता का? त्यावर सनीने सांगितलं, “तो माझ्यापेक्षा बराच लहान आहे आणि असं फार क्वचितच झालं असेल की मी त्याच्यावर हात उचलला असेन.” हे ऐकून बॉबी देओल म्हणतो, “एकदा भावाने मला मारलं होतं. तेव्हा मी शाळेत होतो आणि माझ्या ट्युशन टीचरने भावाकडे तक्रार केली होती. मी नीट अभ्यास करत नाही, असं त्यांनी भावाला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी मला बोलावून त्यामागचं कारण विचारलं. मी उत्तर दिलं नाही म्हणून त्याने मला मारलं होतं.”

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘आधुनिक युग की मीरा’:12 साल की उम्र में हिंदी बांग्ला गानों में दी आवाज

‘आधुनिक युग की मीरा’:12 साल की उम्र में हिंदी बांग्ला गानों में दी आवाज   …

मेरे करियर में मेरा धर्म कभी बाधा नहीं बना-अभिनेत्री जोया

मेरे करियर में मेरा धर्म कभी बाधा नहीं बना-अभिनेत्री जोया का बयान   टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *