नागपूर मार्गांवरील 18 रेल्वे रद्द : नेमके कारण काय?

विश्व भारत ऑनलाईन :

चौथ्‍या रेल्‍वे लाईनचे काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द होत आहेत. याच चौथ्‍या लाईनच्‍या कामामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.रेल्‍वे प्रशासनाकडून पश्चिम बंगालमधील बिलासपूर विभागात सुरू असलेले चौथ्या रेल्वे मार्गाचे काम अद्याप सुरूच आहे. या कामासाठी मागील दोन महिन्यांत तीन वेळा गाड्या रद्द करण्यात आल्या. आता पुन्हा जळगाव रेल्वे मार्गाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने 21 ते 28 सप्टेंबर या दरम्‍यान भुसावळ विभागातून धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. श्रावण महिन्यातही ऐन सणोत्सवाच्या काळात आठ दिवस गाड्या रद्द होत्या. आता पुन्हा नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या गाड्या रद्द

भुसावळ विभागातील शालिमार एक्स्प्रेस, हावडा- मुंबई मेल, पुरी– मुंबई एक्सप्रेस, हावडा- मुंबई, दुरंतो एक्सप्रेस, पुणे- हावडा दुरंतो एक्सप्रेस, हावडा- पुणे एक्सप्रेस, हटिया- पुणे एक्सप्रेस, समरसता सुपरफास्ट एक्सप्रेस, भुवनेश्वर एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, शालिमार- भुज एक्सप्रेस, पोरबंदर- शालिमार एक्सप्रेस, ओखा- शालिमार एक्सप्रेस, मालदा- सुरत एक्सप्रेस, कामाख्या एक्सप्रेस, साईनगर शिर्डी एक्सप्रेस, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस.

About विश्व भारत

Check Also

अमित शाह ने की विदर्भ की सभी रैलियां रद्द

अमित शाह ने की विदर्भ की सभी रैलियां रद्द टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती? NIA कोर्ट क्या है फैसला?

मुसलमानों को भड़काकर आतंकी संगठन में भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट कोलकाता। मुसलमानों को …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *