Breaking News

रेल्वे आरक्षण : दिवाळीसाठी कन्फर्म तिकीट, विदर्भातील कोणत्या गाड्या… वाचा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

सणासुदीचा काळ आणि त्यातच दिवाळीच्या दिवसात शहरातून गावाकडे येणाऱ्यांची संख्या अधीक असते. यामुळे रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल हाेते. मात्र, दिवाळीत अमरावती, विदर्भ, सूरत-भुसावळ, हुतात्मा व महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांचे काही बर्थ रिकामे आहेत. यामुळे आताच आरक्षण केल्यास या गाड्यांचे कन्फर्म तिकीट प्रवाशांना मिळू शकते.

दिवाळीत या गाड्यांमध्ये जागा

Advertisements

🚆अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये दि. १८ आॅक्टाेबरला ३३ सीट रिकामे आहेत.

🚆नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये १८ व १९ ऑक्टोबरला २० सीट रिकामे आहेत, तर २० नंतर वेटीग तिकीट मिळेल.

🚆गाेंदिया-काेल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये १७ ऑक्टोबरला ६३ सीट,

🚆दानापूर-पुणे या गाडीत १८ ऑक्टोबर १२ सीट,

🚆सूरत-भुसावळ एक्स्प्रेसमध्ये दि. १७ ते २० ऑक्टोबर या काळात १८८ सीट,

🚆सूरत-भुसावळ एक्स्प्रेस (दुपारची) या गाडीत याच काळात २०० सीट रिकामे आहेत.

🚆पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये दि. १७ व १८ ऑक्टोबरला ३०० सीट रिकामे आहेत.

दिवाळीत बहुतांश सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल असते. त्यामुळे कनफर्म तिकीट मिळणे जरा कठीण असते.काही गाड्यांचे वेटींग तिकीटही मिळत नाही. गाड्यांना नाे-रूम असल्याने प्रवाशांची गैरसाेय हाेते. यामुळे लांबचे प्रवाशी तिकीट २ ते ३ महिने आधीच आरक्षण करतात.

या गाड्यांना नाे-रूम
पुण्याकडून भुसावळकडे येणारी आझाद हिंद एक्स्प्रेस, झेलम, पुणे-दानापूर एक्स्प्रेस या गाड्यांना दि. १९ ते २४ ऑक्टोबर या काळात नाे-रूम आहे. तर महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाडीला १९ ते २३ आॅक्टाेबर या काळात नाे-रूम आहे. गाेवा एक्स्प्रेस २० ते २३ दरम्यान नाे-रूम, पुणे-नागपूर नाे-रूम तसेच मुंबईकडून येणारी गीतांजली एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस या गाड्यांना २० ते २३ ऑक्टोबर या काळात नाे-रूम, पठाणकाेट एक्स्प्रेसला १६५ वेटीग, पुष्पक एक्स्प्रेस १३३ वेटींग. सूरतकडून येणारी ताप्ती गंगा एक्स्प्रेस, नवजीवनला नाे-रूम आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अयोध्‍येला जाण्‍यासाठी नागपूर?अमरावतीहून विशेष रेल्‍वे

उत्तर प्रदेशातील अयोध्‍या येथे २२ जानेवारीपासून प्रभू श्रीरामाचे मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. रामभक्‍तांना रामलल्‍लांचे …

नागपूरवरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या होणार रद्द : प्रवास करण्याआधी वाचा

रेल्वे रुळ आणि सिग्नलिंगचे काम करण्यात येणार असल्याने पुढच्या काळात (१५ जानेवारीनंतर आणि फेब्रुवारी ) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *