Breaking News

आधारकार्डमध्ये होणार बदल… चला जाणून घ्या…

विश्व भारत ऑनलाईन :

आधारकार्ड हा भारतीय नागरिकांच्या ओळखीचा महत्त्वाचा पुरावा समजला जातो. सुरुवातीला आधार कार्डची गरज मर्यादित होती. मात्र हळूहळू सरकारनं आधारकार्ड दाखवणं अनेक ठिकाणी अनिवार्य केलं. आता अनेक गोष्टींच्या नोंदणीसाठी ओळखीचा व रहिवासी पुरावा म्हणून आधारकार्ड ग्राह्य धरलं जातं.

बदल काय?

आधारकार्डचं कार्यक्षेत्र आता आणखी वाढवण्याबाबत सरकारचा विचार आहे. दर 10 वर्षांनी नागरिकांनी बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी, यासाठी UIDAI नागरिकांना प्रोत्साहन देणार आहे.

सरकारी पैशाचं नुकसान कमी करण्यासाठी राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात आधारकार्डचं कार्यक्षेत्र विस्तारावं, असं युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) राज्यांना सांगितलं आहे. त्या संदर्भातलं पहिलं पाऊल सरकारनं उचललं आहे. दर 10 वर्षांनी आधारकार्डावरील बायोमेट्रिक माहिती अपडेट करावी, असं UIDAI चं म्हणणं आहे. अर्थात हे सक्तीचं नसून, यामुळे बनावट आधारकार्डला लगाम बसेल व लोकांची माहितीही सुरक्षित राहील असं त्यांचं म्हणणं आहे.

लहान मुलांसाठी कोणता नियम?

आधारकार्डबाबत 5-15 वयोगटाच्या मुलांना माहिती अपडेट करण्याचा नियम आहे. या वयोगटातील मुलांचा शारीरिक विकास होत असतो. हाताच्या रेषाही बदलत असतात. त्यामुळे या वयोगटातील मुलांची माहिती वेळोवेळी अपडेट करावी असं UIDAI नं सांगितलं आहे. दर 10 वर्षांत कोणीही व्यक्ती आधारकार्डवरची माहिती अपडेट करू शकते, असं UIDAI नं काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं आहे. यात बायोमेट्रिक (Biometric And Demographic) व डेमोग्राफिक माहितीचा समावेश आहे. अजून हा नियम स्वरूपात नाही. ही माहिती 70 वर्षांवरील व्यक्तीनी अपडेट करण्याची आवश्यकता नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जवळच्या आधार केंद्रावर (Aadhar Seva Kendra) जाऊन ही माहिती अपडेट करता येऊ शकते. आधारकार्डचा गैरवापर रोखण्यासाठी आधारकार्ड तातुपरतं लॉक करण्याची सुविधा असल्याचं UIDAIनं सांगितलं आहे. या खास सुविधेमुळे ग्राहकांना त्यांची माहिती हवी तेव्हा लॉक किंवा अनलॉक करता येऊ शकते. यामुळे डेटा सुरक्षित (Data Safety) राहील.

नोंदणी कीती?

यंदाच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलैदरम्यान 0-5 वयोगटासाठी 79 लाख आधारकार्डची नोंदणी झाली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत 5 वर्षांपेक्षा मोठ्या 2.64 कोटी मुलांकडे बाल आधार कार्ड होतं. जुलैमध्ये हा आकडा 3.43 कोटी झाला. देशात आतापर्यंत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 93.41 टक्के नागरिकांचं आधारकार्ड बनवलं गेलं आहे.

आधारकार्डच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन सरकार व UIDAIनं ग्राहकांना आधारवरची माहिती अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

About विश्व भारत

Check Also

भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणती कारवाई होणार?

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग …

पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम

पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *