Breaking News

शासकीय बदल्यांसाठी अ‍ॅप, ऑनलाईन प्रक्रिया… देवाण-घेवाणवर निर्बंध?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

बदल्यांच्या निमित्ताने चालणाऱ्या देवाण-घेवाणीवर लगाम लागणार आहे. यापुढे आरोग्य विभागातील शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय आयोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला आहे.

Advertisements

त्याचप्रमाणे महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात अठरा वर्षांवरील सुमारे तीन कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येणार आहे.

गोंधळ कमी होणार

बदल्यांमधील गोंधळ, आरोप-प्रत्यारोपापासून लांब राहण्याचा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार विभागातील सर्व बदल्या केवळ ऑनलाइनच करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यासाठी एक अ‍ॅप तयार करण्यात येणार असून बदलीस पात्र कर्मचाऱ्यांनी तीन पर्याय द्यावेत. बदल्यांसाठी कोणाचेही शिफासरपत्र चालणार नाही. कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीनेच या बदल्या होतील, अशी माहिती सावंत यांनी दिली.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाना’त सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत १८ वर्षांवरील महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज तपासणी शिबिरे घेण्यात येतील. उपकेंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत मातांची तपासणी, समुपदेशन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ग्रामीण रुग्णालय आणि त्यावरील रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञांची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, असे सावंत यांनी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उपजिल्हाधिकाऱ्याने केला वन जमीन घोटाळा : महसूल मंत्री बावनकुळे कोणती कारवाई करणार?

रायगड जिल्ह्यातील उरण येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी (महसूल) राहुल मुंडके यांनी बेकायदेशीरपणे वनांचे शेरे 7/12 …

भाजप आमदाराच्या ‘पीए’ची अधिकाऱ्याला शिवीगाळ : जंगल सफारी

भाजपचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया यांचे स्वीय सहायक (पीए) महेश प्रेमळवार यांनी व्यवस्थापन कोट्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *