Breaking News

आमिर खान वादाच्या भोवऱ्यात : हिंदू प्रथेविरोधात जाहिरात?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हिंदू प्रथेविरोधात एक जाहिरात केली आहे. आमिर खानने भारत सोडून पाकिस्तानात राहायला जावे. नेहमी हिंदूचा अपमान करण्याचे आमिर खानने ठरविले आहे. त्यामुळे आमिर खानवर कारवाई व्हावी, अशी मागणी अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केली आहे. त्यावरून नेटकरी आमिर खानवर भडकले आहेत.

प्रकरण काय?

Advertisements

एयू स्मॉल फायनान्स बँकेची ही जाहिरात आहे. यामध्ये आमिर खान आणि कियारा अडवाणी यांनी नवविवाहितांची भूमिका साकारली आहे. लग्नानंतर कारमधून ते घरी जात असतात. पाठवणीच्या वेळी कोणीच रडलं नाही, यावर ते एकमेकांशी चर्चा करत असतात. कारमधून उतरल्यानंतर हे लक्षात येतं की नवरा (आमिर खान) हा नवरीच्या (कियारा अडवाणी) घरी राहायला आला आहे. वधूच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी वर तिच्या घरी राहायला येतो. नववधू ही नवऱ्याच्या घरी गृहप्रवेश करण्याची प्रथा आहे. मात्र या जाहिरातीत आमिर खान वधूच्या घरी पहिलं पाऊल ठेवतो. त्यानंतर तो म्हणतो, “शतकांपासून चालू असलेल्या प्रथा चालूच ठेवण्यात काय अर्थ आहे? म्हणून आम्ही प्रत्येक बँकिंग परंपरेबाबत प्रश्न उपस्थित करतोय, ज्यामुळे तुम्हाला चांगली सेवा मिळू शकेल.”

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘आधुनिक युग की मीरा’:12 साल की उम्र में हिंदी बांग्ला गानों में दी आवाज

‘आधुनिक युग की मीरा’:12 साल की उम्र में हिंदी बांग्ला गानों में दी आवाज   …

मेरे करियर में मेरा धर्म कभी बाधा नहीं बना-अभिनेत्री जोया

मेरे करियर में मेरा धर्म कभी बाधा नहीं बना-अभिनेत्री जोया का बयान   टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *