Breaking News

आता ‘वर्क फ्रॉम पब’

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
कोरोना काळात घरातून बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कामाच्या स्वरूपात बदल झाला आहे. जगभरातील कोट्यावधी कंपन्यांनी कोरोना काळात घरी राहून वर्क फ्रॉम होम काम करण्याची दिलेली संधी नवी पद्धत प्रचलित झाली. या नवीन युगात प्रवेश केल्यानंतर अनेक कंपन्या कामाचे नवनवे प्रयोग करताना दिसून येत आहेत. तात्पुरत्या स्वरूपात सुरू झालेली ही पद्धत आगामी काळातील मोठ्या प्रमाणात पोहचली. काही कंपन्यांनी ही पद्धत कायमस्वरूपाची केली. वर्क फ्रॉम म्हणजे घरून काम करणे अशी संकल्पना आहे. ही पद्धत रूढ झाली आहे. परंतु आता वर्क फ्रॉम या पद्धतीच्या पुढचे पाऊल टाकत नवी संकल्पना ब्रिटनमध्ये सुरू झाली आहे. ब्रिटिश पब मालकांनी आणि आता ‘वर्क फ्रॉम पब’ ही सुविधा देण्यास सुरूवात केली आहे.

Advertisements

लॅपटॉप वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करत असताना घरातील लाईट बिलातून सुटका मिळावी यासाठी येथील पबने ही सुविधा आणलेली आहे. याकरिता पबची वाढती संख्या वाढविण्यात आली आहे. वर्क फ्रॉम पब संकल्पनेची ऑफर पब चालकांनी आता कर्मचाऱ्यांना दिली आहे.द गार्डियन मध्ये याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Advertisements

380 पबनी फुलर्स चैनच्या माध्यमातून या कराराची ऑफर दिली आहे. यामध्ये दिवसाला ११ डॉलर रूपये इतका मोबदला आकारला जाईल. पण यंग्सने 185 पबमध्ये १७ डॉलरमध्ये खाण्या-पिण्याच्या सुविधा दिली आहे. यामध्ये एका पबला दुसऱ्या पबशी संपर्क ठेवून काम करावे लागते. जेवणामध्ये सँडविच, चहा आणि कॉफी याचा समावेश असतो.

 

(बातमीत संग्रहित छायाचित्र)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील आंभोरा ब्रिजचे अमेरिकेतील लॉस एंजिल्सचे काय आहे कनेक्शन?वाचा

विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्‍याचा लौकिक आहे. याच आंभोऱ्यात आंभोरा केबल स्टेड …

धोखेबाज चीन और पाकिस्‍तान गठजोड़ पर भारत की पैनी नजर, रहना होगा हर वक्‍त चौकन्‍ना-एडमिरल करमबीर सिंह का बयान 

धोखेबाज चीन और पाकिस्‍तान गठजोड़ पर भारत की पैनी नजर, रहना होगा हर वक्‍त चौकन्‍ना- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *