Breaking News

भाजप नेत्यांची तक्रार भोवली?, औरंगाबाद जिल्हाधिकारी यांची बदली…आणखी 20 आयएएसच्या बदल्या…

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
शिंदे सरकारचे पाठबळ असतानाही औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची बदली झाल्याने सर्वाना आश्यर्याचा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद महसूल कर्मचाऱ्यांनी चव्हाण यांची विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. तर, काही भाजपच्या नेत्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चव्हाण यांच्याविरोधात फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. तर, बरेच कर्मचारी आणि अधिकारी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराज होते.

Advertisements

शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील पुन्हा 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी केल्या. यात मुख्यत्वे औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची मुंबईच्या विकास, आयुक्त असंघटीत कामगार मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी कधीकाळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे अधिकारी समजले जाणारे औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Advertisements

1. मिताली सेठी यांची संचालक, वनामती, नागपूर येथे नियुक्ती

2. वीरेंद्र सिंग, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, मुंबई यांची M.D., Maha म्हणून नियुक्ती

3. सुनील चव्हाण जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई येथे नियुक्ती

4. अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी नियुक्ती.

5. दीपक कुमार मीना, अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर यांची अतिरिक्त तिरबल आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती.

6. विनय गौडा, सातारा यांना जिल्हाधिकारी, चंद्रपूर या पदावर नियुक्ती

7. आर के गावडे, सीईओ झेडपी. नंदुरबार येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई म्हणून नियुक्ती

8. माणिक गुरसाल, यांची अतिरिक्त आयुक्त (उद्योग) म्हणून नियुक्ती

9. शिवराज श्रीकांत पाटील, जॉइंट एमडी सिडको, मुंबई यांची एम.डी., महानंद मुंबई म्हणून नियुक्ती

10. अस्तिक कुमार पांडे, यांची औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

11. लीना बनसोड, यांची M.D., M S Co-Op आदिवासी देवे म्हणून नियुक्ती

12. दीपक सिंगला, M.D. M S Co-Op आदिवासी देवे. कॉर्पोरेशन नाशिक, एमएमआरडीए, मुंबईचे सहआयुक्त म्हणून नियुक्ती.

13. एलएस माली, सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण मुंबई यांची संचालक, OBC बहुजन कल्याण संचालनालय, पुणे म्हणून नियुक्ती.

14. एस सी पाटील, यांना उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाचे सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

15. डीके खिलारी, जॉइंट इंस्पेक्टर जनरल ऑफ स्टॅम्प्स यांची सीईओ झेडपी सातारा म्हणून नियुक्ती.

16. एस के सलीमथ ZP पालघर यांची जॉइंट एमडी, सिडको, मुंबई म्हणून नियुक्ती.

17. एसएम कुर्तकोटी, यांची CEO, जिल्हा परिषद नंदुरबार म्हणून नियुक्ती.

18. आर डी निवतकर, आयएएस-2010 जिल्हाधिकारी मुंबई यांना आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, मुंबई आणि जिल्हाधिकारी मुंबईचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला.

19. बीएच पलाव्हे, आयुक्त विभागीय आयुक्त, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी पालघर म्हणून नियुक्ती.

20. आर एस चव्हाण यांची महसूल मुद्रांक आणि वन विभाग मंत्रालय, मुंबई या पदावर सहसचिव म्हणून नियुक्ती

Advertisements

About विश्व भारत

Check Also

रस्ते बांधकाम थांबणार : कंत्राटदार महासंघाचा आजपासून काम बंदचा निर्णय

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षात सुमारे एक लाख कोटींपेक्षा जास्तीची कामे …

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *