Breaking News

दिवस करवाचौथचा : नवरा प्रेयसीसोबत सापडला रंगेहाथ

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

करवाचौथच्या दिवशी बायकोला बाजूला सारून प्रेयसीला शॉपिंगसाठी घेऊन जाणे एका नवऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. भर बाजारात पाठलाग करीत बायकोने चपलाने धुवून काढत नवऱ्याच्या डोक्यातून प्रेमाचे भूत उतरवल्याची घटना घडली आहे. नवऱ्यासोबत असणाऱ्या प्रेयसीचाही तिने खरपूस समाचार घेतला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत संबंधित आरोपी पतीला ताब्यात घेतले.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित पतीला शांतता भंग केल्याबद्दल अधिक चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच त्याच्या सोबतच्या प्रेयसीला समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

Advertisements

उत्तर प्रदेशातील सिहानी गेट पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा विवाह विजयनगर येथील तरुणाशी झाला होता. लग्नानंतर दोघांचे विचार जुळले नाहीत आणि क्षुल्लक कारणांवरून घरगुती भांडण होण्यास सुरू झाले. या तरुणाचे एका महिलेशी संबंध असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले.

गुरुवारी करवा चौथच्या दिवशी तो त्याच्या प्रेयसीला खरेदीसाठी तुराबनगर मार्केटमध्ये घेऊन गेला. ही माहिती त्याच्या पत्नीला समजल्यांनतर ती संताप व्यक्त करत ती घटनास्थळी पोहोचली आणि दोघांनाही रंगेहाथ पकडले.

बाजारपेठेत गर्दी

रंगेहाथ सापडलेल्या तरूणाच्या पत्नीने भर बाजारात गोंधळ घातला. दिवसा करवाचौथचा चंद्र दाखवत तिने पतीला आणि त्याच्या प्रेयसीला चपलांचा प्रसाद दिला. त्यामुळे बाजारपेठेत बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांनाही ताब्यात घेतले. पोलीस कर्मचारी अमित कुमार खारी यांनी सांगितले की, पतीला शांतता भंग केल्याबद्दल आर्थिक दंड ठोठावण्यात येणार आहे आणि त्याच्या मैत्रिणीला इशारा देऊन सोडण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

प्रेगनेंसी में भी अभिनेत्रियों ने की थी फिल्मों की शूटिंग

प्रेगनेंसी में भी अभिनेत्रियों ने की थी फिल्मों की शूटिंग 1997 में, श्रीदेवी अपनी पहली …

राजेश खन्ना के साथ लिव-इन में थी अंबानी परिवार की बहू

राजेश खन्ना (काका) के साथ लिव-इन में रहती थीं अंबानी परिवार की बहू | एक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *