विश्व भारत ऑनलाईन :
पटसंख्या कमी असलेल्या 14 हजार मराठी शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कमी पटसंख्येच्या शाळा या दुर्गम, अतिदुर्गम, ग्रामीण भाग, आदिवासी पाडे या भागात आहेत.जिल्हा परिषदांच्या शाळांमधून शेतकरी, कष्टकरी, गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असतात. गाव-खेड्यातील या शाळा बंद केल्या तर ही मुले शिक्षणापासून वंचित राहतील, अशी भीतीही पटोले यांनी व्यक्त केली. मराठी व्यापक हित चळवळीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आणि पटसंख्या सक्तीच्या तडाख्यातून मराठी शाळा वाचवा, असे आवाहन केले. या शाळा बंद पडू देणार नाही, अशी नि:संदिग्ध शब्दांत घोषणा करण्याची मागणीही त्यांनी केली.