Breaking News

ट्रम्प पिसाळल्याने जगात भीती : इराणवर हल्ले मजा म्हणून करणार

Advertisements

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या खर्ग बेटावर पुन्हा हल्ले चढविण्याची धमकी दिली असून, होर्मुझ सामुद्रधुनीतील कोंडी सोडविण्यासाठी मित्रदेशांनी युद्धनौका तैनात कराव्यात असे आवाहन केले आहे. इराणनेही प्रतिहल्ले तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प पिसाळला असून काहीही करण्याची जगात भीती निर्माण झालीय.

Advertisements

 

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा हा तिसरा आठवडा आहे. अमेरिकेने यापूर्वी केलेल्या हल्ल्यात खर्ग बेट पूर्ण नष्ट झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ‘मजा म्हणून इराणवर आणखी हल्ले करणार’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisements

 

पश्चिम आशियातील मित्रदेशांनी अमेरिकेसमोर चर्चेचा ठेवलेला प्रस्ताव ट्रम्प प्रशासनाने फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युद्ध संपविण्यासाठी इराण तयार आहे. पण, त्यासाठीच्या अटी अद्याप आम्हाला हव्या तशा नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमावर टिप्पणी करून अन्य देशांनी युद्धनौका पाठवाव्यात असे आवाहन केले.

 

इराणचा प्रत्युत्तराचा इशारा

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनीही इराणमधील तेलाच्या सुविधांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला. इराणच्या तेलकेंद्रांना लक्ष्य केले, तर अमेरिकेच्या या भागात असलेल्या तेल, आर्थिक आणि ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करू, असा इशारा त्यांनी दिला. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने माहिती दिली, की इस्रायल आणि या भागातील अमेरिकेच्या तीन तळांना क्षेपणास्त्र आणि डोन्सनी लक्ष्य केले. इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांना भेदले जात असल्याचे इस्रायलने सांगितले. सौदी अरेबियानेही १० ड्रोन्स पाडल्याचा दावा केला.

 

’ खर्ग बेटांवर ‘यूएई’मधून हल्ला केल्याचा इराणचा दावा

 

’ युद्धात आतापर्यंत २००० जणांचा मृत्यू. मृतांमधील सर्वाधिक इराणमधील.

 

’ अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध वापरासाठी रशिया इराणला शहेद ड्रोनचा पुरवठा करीत असल्याचा युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचा दावा

 

’ बगदादमधील अमेरिकी दूतावास पुन्हा क्षेपणास्त्रांनी लक्ष्य. हल्ल्याची जबाबदारी कुणीही स्वीकारली नाही.

 

’ या युद्धात इराण आणि लेबनॉनमध्ये मिळून २,००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. हे युद्ध येत्या काही आठवड्यांमध्ये संपेल असा अंदाज अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राइट यांनी व्यक्त केला.

 

’ मोज्तबा खामेनी हेदेखील मारले गेले असावेत, असा अंदाज ट्रम्प यांनी व्यक्त केला. मात्र, खामेनी ठणठणीत आहेत आणि युद्धााचे व्यवस्थापन करत आहेत, असे अराघची यांनी सांगितले. युद्ध थांबवण्यासाठी इराणबरोबर समझोता करायला आम्ही तयार नाही. अमेरिकेच्या हल्ल्यांनी खर्ग बेट पूर्णपणे नष्ट झाले आहे आणि त्यावर आम्ही आणखी हल्ले करू. आम्ही केवळ गंमत म्हणून आणखी हल्ले करू शकतो. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

Advertisements

About विश्व भारत

Check Also

ट्रम्प एकटा पडलाय : मित्र देश इराण युद्धातून अमेरिकेपासून दूर

ट्रम्प एकटा पडलाय : मित्र देश इराण युद्धातून दूर दिनांक २८ फेब्रुवारीला सुरू झालेले युद्ध …

अमेरिकी आयोग अपनी रिपोर्ट में भारत कें धार्मिक स्वतंत्रता पर चिंतित 

अमेरिकी आयोग अपनी रिपोर्ट में भारत कें धार्मिक स्वतंत्रता पर चिंतित   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *