Breaking News

शिंदे पुन्हा शिवबंधन बांधणार?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
उद्धव ठाकरे सध्या सक्रिय झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकर गट एक्शन मोडमध्ये आहे. यवतमाळमध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख शिवबंधन बांधत आहेत. तर दुसरीकडे बुलढाणा विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि आता शिंदे गटात सामील झालेले संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी उद्धव गटाने कामाला सुरुवात केली आहे.

Advertisements

माजी आमदार विजयराज शिंदे हे पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिंदे हे शिवसेनेचे 3 वेळेस आमदार होते. शिंदे सध्या भाजपात आहेत. त्यामुळे बुलढाण्याचे शिंदे गटाचे विद्यमान आ.संजय गायकवाड यांना विजयराज शिंदे यांच्याकडून आव्हान देण्याची रणनिती उद्धव गटाकडून आखली जात आहे, अशी चर्चा सध्या जिल्हाभरात आहे.

Advertisements

शिंदे यांची प्रतिक्रिया

शिवबंधन कधी बांधणार, असा प्रश्न शिंदे यांना विचारण्यात आला. यावर “ही लोकशाही आहे. आणि मी 15 वर्षात शिवसेनेचा आमदार म्हणून केलेल्या कामाची कुणी दखल घेत असेल तर वावगे काय? मात्र,उद्धव गटाच्या कुठल्याच मोठ्या नेत्यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही”, अशी प्रतिक्रिया विजयराज शिंदे यांनी दिली. दरम्यान बुलढाण्यात आता बंडखोर आ.संजय गायकवाड यांना शह देण्यासाठी हालचालींना वेग आल्याचे चित्र राजकीय वर्तुळात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा

पश्चिम बंगाल में चुनाव पूर्व- पश्चात देखने मिलती है राजनीतिक हिंसा टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन

कांग्रेस के वरिष्ठ नेता पूर्व सांसद दत्ता भाऊ मेघे का निधन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *