Breaking News

हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी पीठ खा : पण कोणते…

Advertisements

वजन कमी करण्यासाठी व्यायामापासून ते वेगवेगळ्या डाएटपर्यंत सर्व गोष्टी आपण करतो. मात्र आहारात काही छोटे छोटे बदल करूनही वजन कमी करता येऊ शकते. सर्वजण आहारात मोठ्या प्रमाणावर गव्हाच्या पिठाचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहित आहे का गव्हाऐवजी शिंगाड्याचे पीठ खाण्यासाठी वापरले तर हे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी शिंगाड्याचे पीठ आहारात कसे समाविष्ट करावे.

Advertisements

शिंगाडा

Advertisements

शिंगाड्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतात. तसेच त्यात खूप कमी कॅलरीज असतात. यामध्ये प्रोटिन्स, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6 आणि रिबोफ्लेविन भरपूर प्रमाणात असते. यामध्ये आढळणारे फायबर पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे कॅलरीज कमी आहेत. यामुळे पोटाच्या विविध समस्या दूर राहतात. हे शरीराला अनेक गंभीर आजारांपासून वाचवते.

शिंगाड्याच्या पिठाचा तुम्ही अनेकप्रकारे वापर करू शकता. पोळ्या, पुऱ्या भजी बनवण्यासाठी किंवा ढोकळा, इन्स्टंट डोसा बनवण्यासाठीही हे पीठ उपयुक्त आहे. तुम्हाला सहज वजन कमी करायचे असेल तर शिंगाड्याचे पीठ नाश्त्यामध्ये खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही मग तुम्ही जास्त खाणं किंवा सारखं सारखं काहीतरी खाणं टाळता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पित असाल तर..!

शरीरातील पाण्याची पातळी राखणे हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, त्यामुळे तज्ज्ञ रोज १० ते १२ …

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय!

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *