✍️विश्व भारत विशेष
नागपूर जिल्हा परिषद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. आता संगणक टायपिंग (GCC-TBC) प्रमाणपत्राचे निकाल वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. मात्र, नागपूरच्या शिक्षण उपसंचालकांना दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी निकालाच्या कागदपत्रांची फाईल वाटप करण्यासाठी नागपूरच्या माध्यमिक विभागाकडे जमा करण्यात आली होती.
पण, आजपर्यंत फाईल वाणिज्य टायपिंग इन्स्टिटयूटकडे वाटप करण्यात आली नसून नागपूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने इतका विलंब का लावलाय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संगणक टायपिंग (GCC-TBC) परीक्षा वादात सापडली आहे.
इतकेच नाही तर शासकीय नोकरीसाठी हजारो विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
निकाल वाटप कधी?
संगणक टायपिंग (GCC-TBC)चे जुलै-ऑगस्ट 2022 चे निकल प्राप्त झाले आहेत. निकाल वाटप 15 ते 19 डिसेंबरपर्यंत सिव्हिल लाईन्सच्या कामगार न्यायालयाजवळील गार्डीनियर शाळेतून सकाळी 11 वाजेपासून होणार आहे.