नागपुरातील भूमी अभिलेख विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. या कार्यालयाने एका सत्तर वर्षीय वृद्धाला जिवंत असताना मृत्यू दाखल्याची मागणी केल्याचे प्रकरण ‘विश्व भारत’ने लावून धरले होते.
या विभागाकडे शेतकरी मोठ्या आशेने बघतोय. शेत मोजणी करण्यासाठी अनेक अर्ज कार्यालयात येतात. पण, नागरिकांना नाहक त्रास देऊन प्राप्त अर्ज निकाली न काढण्याची किमया या विभागातील अधिकारी-कर्मचारी करतात.
अशा भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई कधी होणार असा प्रश्न आहे.महसूल विभागाच्या अख्यातरीत भूमी अभिलेख कार्यालय काम करते. मात्र, महसूल विभाग कधीच या विभागाचा आढावा घेतो की नाही, अशी चर्चा आहे. निव्वळ महसूल गोळा करण्यातच यांचे लक्ष असते का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विश्वभारत News Website