उद्धव ठाकरे सरकारच्या काळात बदली करुन देण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुत्र ऋषीकेश खैरे यांनी पैसे घेतले. यासंदर्भात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये समोरची व्यक्ती काम न झाल्याने ऋषीकेश खैरे यांना बदलीसाठी दिलेले 2 लाख रुपये परत मागत आहे. ऋषीकेश खैरे यांनीही हा व्यवहार झाल्याचे मान्य केले. तर संबंधिताचे पैसे परत देण्यात येतील असे म्हटले आहे.
वन विभागातील एका महिला कर्मचाऱ्याच्या बदलीशी संबंधित आहे. त्या महिला कर्मचाऱ्याचा पती आणि ऋषीकेश खैरे यांच्यातील हे संभाषण असल्याचे दिसत आहे. यामध्ये समोरची व्यक्ती ऋषीकेश यांच्याशी बदलीच्या व्यवहाराबाबत बोलत आहे. त्यात बदलीसाठी 2 लाख रुपये दिल्याचा आणि बदलीचे काम झाले नाही, तरीही पैसे परत न मिळाल्याचा उल्लेख आहे. पैसे देऊन दीड दोन वर्ष झाल्याचाही उल्लेख संभाषणात आहे. त्यावरुन हे प्रकरण ठाकरे सरकारच्या काळातील असल्याचे समोर येत आहे.
ऋषीकेश यांच्याकडून त्या व्यक्तीला आठ दिवसात काम करुन देऊ किंवा पैसे परत देऊ अशी तयारी दाखविण्यात आली. त्यावर समोरील व्यक्ती काम करु नका, आता बदलीसाठी मी दुसऱ्याला पैसे देऊन बसलो आहे, तुम्ही पैसेच परत द्या, अशी मागणी करतो. शेवटी ऋषीकेश हे देखील ठिक आहे, आठ दिवसात पैसे देऊन टाकतो, असे म्हणताना आढळतात. सध्या ही क्लिप व्हायरल होत असून ठाकरे सरकारच्या काळात बदल्यांसाठी पैसे घेतले जात असल्याची चर्चा आहे.
विश्वभारत News Website