Breaking News

बिअर बार मालकाकडून लाच : तिघे अटकेत

Advertisements

नाशकातील निफाड येथील बिअर बार मालकाकडून 9 हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी व अन्य दोघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली. हॉटेल व्यवसायात त्रुटी न काढण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून संबंधितांनी ही रक्कम मागितली होती.

Advertisements

तक्रारदार व्यक्तीचा बार आणि रेस्टॉरंटचा व्यवसाय असून, त्याचे तीन ठिकाणी दुकाने आहेत. या तीनही दुकानांमधून हॉटेल व्यवसाय कामांमध्ये त्रुटी न काढता व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी चार हजार रुपयेप्रमाणे 12 हजार रुपयांचा वार्षिक हप्ता म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी लोकेश संजय गायकवाड आणि निफाड येथील पंडित रामभाऊ शिंदे व प्रवीण साहेबराव ठोंबरे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितलेली होती. तडजोडीअंती 9 हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित झालेले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून संशयित ठोंबरे यास 9 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अचानक दुल्हा विवाह मंडप से भागता देख मेहमानों मे खलबली

अचानक दुल्हा विवाह मंडप से भागता देख मेहमानों मे खलबली टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख

नाबालिग का यौन शोषण कर बनाया वीडियो और मांगे 25 लाख टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220 …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *