Breaking News

काय झालं असं!अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने खाल्ले किडे, “त्याची चव…”

मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. आतापर्यंत विविध माध्यमांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. गेली अनेक वर्ष सिनेसृष्टीत कार्यरत असलेल्या मृणाल कुलकर्णी यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. आता त्यांनी शेअर केलेला एक अनुभव खूप चर्चेत आला आहे.

शूटिंगच्या शेड्युलमधून वेळ काढून मृणाल कुलकर्णी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. नुकत्याच त्या एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होत्या. या दरम्यान ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चीनला फिरायला गेल्यावर तळलेले किडे खाल्ले असं सांगितलं.

प्रतिक्रिया…

असा कोणता पदार्थ आहे जो अजिबात आवडला नाही, असा प्रश्न त्यांना विचारला गेल्यावर त्या म्हणाल्या, “काही वर्षांपूर्वी मी, विराजस आणि विराजसचे बाबा असे आम्ही चीनला फिरायला गेलो होतो. तिथे खूप इंटरेस्टिंग पदार्थांची नावं दिसत होती, पण ते नक्की काय असेल याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. तेव्हा आम्हाला काही तळलेले किडे मिळाले. त्याची चव फार छान होती पण त्याचं जे वर्णन होतं ते ऐकल्यावर काही खाण्याची शक्यता नव्हती.”

About विश्व भारत

Check Also

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *