विधानसभा निवडणुकीसाठी (२० नोव्हेंबर) पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला असून मागच्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे वाढलेले मतदान नेमके कुणाच्या पारड्यात जाणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले आहेत. अनेक एक्झिट पोल्सनी महायुतीला बहुमत प्राप्त होईल, असा अंदाज वर्तविला आहे. तर काही पोल्सनी राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे. एक्झिट पोल्सनंतर आता राजकीय प्रतिक्रियाही समोर येत आहेत. महायुतीने एक्झिट पोल्सवरून आनंद व्यक्त केला आहे. तर महाविकास आघाडीने निकालाच्या दिवसाची वाट पाहू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, काँग्रेस आमदारांना कर्नाटक राज्यात घेऊन जाऊ शकते.
Check Also
सकाळी ८ वाजता मतपेटी उघडणार : राज्याला कुणाचे सरकार लाभणार?
आज शनिवारी (दि. २३ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी …
उटी, गुवाहाटीला जाणार नाही तर लंडनला…: शिंदे गटाचे सत्तास्थापनेसाठीचे ‘डेस्टिनेशन’
एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील, त्या दिशेने आम्ही जाऊ, असे विधान संजय शिरसाट यांनी केले …