Breaking News
Oplus_131072

मुरूमासाठी तलाठ्याने घेतले १० हजार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कारवाई करणार का?

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील कुही तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी पैशाशिवाय काम करत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. चितगाव येथे पांधन रस्ता बांधकामासाठी मंगेश झाडे नावाच्या तलाठीने कंत्राटदाराकडून १० हजार रुपयांची लाच घेतल्याचा दावा अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी केला आहे.

Advertisements

 

प्रकरण काय आहे?

Advertisements

 

चितगाव येथील पांधन रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. पण शेतात मोठी गाडी जात नसल्याने शेताच्या जवळ मुरूम टाकण्यात आला. शेताच्या बाजूला असलेला मुरूम पांधनपर्यंत घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टरद्वारे मदत घेण्यात आली. त्यासाठी तलाठी मंगेश झाडे यांनी कंत्राटदाराकडून १० हजार घेतले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी कारेमोरे यांनी केली आहे. तसेच महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार करणार असल्याची माहिती कारेमोरे यांनी दिली. शेतकऱ्यांना पांधन रस्ते तयार करून देण्यासाठी राज्य सरकारने कार्यक्रम जाहीर केलेला आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या गृह जिल्ह्यात या योजनेचा बट्ट्याबोळ खुद्द महसूल विभाग करत असल्याचा हा प्रकार समोर आला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

२१ एप्रिलपासून शासकीय कर्मचारी संपावर!

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीने २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *