Breaking News

साखर, मैदा खाणं सोडा!प्रिया बापट काय म्हणते?

Advertisements

बॉलीवूड असो किंवा मराठी इंडस्ट्री. यामधील अनेक अभिनेत्री अशा आहेत की, ज्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्य आणि फिटनेसमुळेदेखील सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात. अशीच एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. वर्षाच्या सुरुवातीलाच प्रियाने तिचे फिटनेसचे हटके फोटो शेअर करत सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. तिच्या या फोटोंमुळे साहजिकच तिच्या फिटनेसची बरीच चर्चा झाली.

Advertisements

 

प्रिया बापट हा फिटनेस हा केवळ महागड्या जिम किंवा फॅन्सी डाएटवर अवलंबून नाही, तर तिच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचा तो एक भाग आहे. याबद्दल अभिनेत्रीनं स्वत:च विविध मुलाखतींमधून सांगितलं आहे. फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठी अनेक दिवस प्रयत्न करावे लागतात. पण शेवटी त्याचे चांगले परिणाम नक्कीच दिसतात, असं आपल्या आपल्या फिटनेस प्रवासाबद्दल प्रिया सांगते.

Advertisements

 

अशातच आता तिनं तिचा डाएट प्लॅनसुद्धा सांगितला आहे. इन्स्टाग्रामवर तिनं नुकताचं चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी प्रियाला तिच्या फिटनेसबद्दलचे प्रश्नं विचारली. तेव्हा प्रियानं एका चाहत्याला उत्तर देत सांगितलं की, “माझ्या डाएटबद्दल विचारणाऱ्या सगळ्यांसाठी सांगते की, डाएट हे प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. जे माझ्यासाठी उपयोगी ठरतं, ते तुमच्यासाठी सुद्धा ठरेलच असं नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं काम करतं.”

प्रिया बापट फिटनेस

प्रिया बापट इन्स्टाग्राम स्टोरी

साखर, मैदा आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जपासून दूर राहा : प्रिया बापट

यानंतर तिनं चाहत्यांना फिटनेसबद्दल सल्ला देत म्हटलं की, “घरचं, पारंपरिक आणि सकस अन्न खा. साखर, मैदा आणि प्रिझर्व्हेटिव्ह्जपासून शक्य तितकं दूर राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यायाम… व्यायामाला कोणताही पर्याय नाही.” तसंच तिनं तिच्या फिटनेसच्या प्रवासाबद्दल सांगितलं की, “वर्षानुवर्षांचं सातत्य आणि सहा महिन्यांच्या मेहनतीचं हे फळ आहे.”

व्यायामाच्या वेळेनुसारच पूर्ण दिवसाचं नियोजन करा : प्रिया बापट

इतकंच नव्हे, तर प्रियानं “व्यायामाला तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवा. त्यात सातत्य ठेवा आणि तुमच्या व्यायामाच्या वेळेनुसारच पूर्ण दिवसाचं नियोजन करा” असा सल्लाही तिनं आपल्या चाहत्यांना दिला आहे.

इन्स्टाग्रामवरील संवादात अनेकांनी प्रियाला तिच्या आगामी कामाबद्दलसुद्धा काही प्रश्न विचारले आहेत. ‘हे काय नवीन’ या आगामी सीरिजमधून प्रिया-उमेश ही लोकप्रिय जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

उशी ठरतेय मान-डोकेदुखीचं कारण

शांत झोप प्रत्येकासाठी आवश्यक असते. पण जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मानेमध्ये जडपणा, खांदेदुखी, डोकेदुखी किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *