स्वातंत्र्यवीर वीर सावरकर महान देशभक्त
सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली नाशिक जिल्ह्यातील भागुर येथे झाला. सावरकरांच्या मनात जन्मापासूनच देशभक्तीची भावना ज्वालामुखी सारखी धकधकत होती आणि जसे-जसे सावरकर मोठे होत गेले तसतशी स्वातंत्र्यासाठी मशाल प्रज्वलित होत होती.वीर सावरकरांनी लाला लजपतराय,बाळ गंगाधर टिळक व विपिन चंद्र पाल या महान क्रांतिकारक महापुरुषांपासुन प्रेरणा घेऊन आपली वाटचाल सुरू केली आणि क्रांतीचा लढा सुरू ठेवला व कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता भारताला स्वतंत्र मिळावे यासाठी स्वतंत्र लढ्याच्या कुंडात उडी घेतली.१८५७ च्या गनिमी संघर्षाच्या विद्रोहाचा अभ्यास केला.त्यावर आधारित एक पुस्तक लिहिले” द हिस्ट्री ऑफ व वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडंन्स” नावाच्या या पूस्तकाने इंग्रज प्रशासनाचे धाबे दणाणले. त्यामुळे हे पुस्तक इंग्रजांनी बेकायदेशीर ठरविले.परंतु सावरकरांच्या गनिमी काव्याने बिहारमध्ये हे पुस्तक लोकप्रिय झाले आणि स्वातंत्र्याची ज्वाला धकधकायला लागली.सावरकर आणि त्याचा भाऊ गणेश यांनी भारतीय परिषद कायदा १९०९ च्या विरोधात निदर्शने केली.यावर इंग्रजांनी त्यांना गुन्हेगार ठरविले व अटक वॉरंट जारी केला अटक होवू नये म्हणून सावरकर पॅरिसला गेले.नंतर १९१० मध्ये सावरकरांना इंग्रजांनी पकडले व न्यायालयाने त्यांना दोषी ठरवुन ५० वर्षाची शिक्षा ठोठावली. ४ जुलै १९११ ला काळ्या पाण्याची शिक्षा जाहीर झाली व अंदमान आणि निकोबार येथील सेल्युलर जेलमध्ये टाकण्यात आले.तेथे त्यांच्यावर व त्यांच्या सहकाऱ्यांवर इंग्रजांकडुन सतत अत्याचार होत होते. परंतु त्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा धीर सोडला नाही आणि अनेक यातना सहन करीत इंग्रजांना बजाऊन सांगितले की,मी जिवंत आहे तोपर्यंत देश स्वतंत्र झालेला आपल्याला दिसेल व आपल्याला भारत सोडून जावे लागेल आणि हे सावरकरांनी सिद्ध करून दाखविले ही महानता सावरकरांमध्ये दिसून येते.सध्याच्या परिस्थितीत देशातील काही राजकीय पुढारी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह, विद्वेषक व चिथावणी देणारे विधान करतांना दिसतात.ही बाब अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. देशाच्या इतिहासात सावरकरांना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असे संबोधले जाते.म्हणजेच स्वातंत्र्यवीर ही पदवी पारतंत्र्यातील देशभक्तांनीच दिली ही बाब आक्षेपार्हय विधान करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. स्वातंत्रपुर्वकाळ अत्यंत खडतर आणि कठीण होता हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्याकाळी स्वातंत्रवीर सावरकरांच संपूर्ण कुटुंब स्वतंत्र लढ्यात सहभागी होते.महाराष्ट्रात अनेक क्रांतिकारक, थोर पुरुष, साधु-संत, समाजसुधारक,जहालवादी-मवाळवादी होवून गेले त्यामुळे महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात प्रत्येक तळागाळातील व्यक्तींनी आपले वेगवेगळ्या पध्दतीने योगदान दिले आहे.तेव्हाच भारत स्वतंत्र झाला.इंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले.परंतु देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जिवाची पर्वा न करता हसत-हसत फासावर चढले व बलिदान दिले ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.सावरकरांचा काळ कसा होता किंवा त्यांनी स्वातंत्र्य लढा कसा उभारला ही बाब त्याकाळातील सहकाऱ्यांना व देशभक्तांनाच ग्यात असावी. परंतु आता सावरकरांच्या कर्तृत्ववावर कोणी राजकीय पुढारी चीखलफेक करीत असेल व आक्षेपार्ह विधान करीत असेल हे योग्य नाही असे मला वाटते.स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना झालेली काळ्यापाण्याची सजा आणि त्यांनी भोगलेल्या यातना यांचा इतिहास संपूर्ण शालेय पुस्तकांमध्ये लिखित आहे आणि हि शालेय पुस्तके आजची नसुन ७८ वर्षे जुनी आहे.या संपूर्ण पुस्तकांमध्ये अनेक विचारवंतांनी, थोरपुरूशांनी सावरकरांच्या कामाची प्रशंसा सुध्दा केली आहे. तेव्हाच त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी मिळाली व स्वातंत्रवीर सावरकर नावाने संबोधले जावु लागले. राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की स्वातंत्र्यवीर ही पदवी कोणालाही सहज मिळत नाही त्यासाठी त्याग करावा लागतो आणि सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला तेव्हाच त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी मिळाली व भारत स्वतंत्र झाला ही बाब त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.त्याकाळी अनेक उतार चढाव होते यात दुमत नाही.परंतु परिस्थिती नुसार प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या पध्दतीने निर्णय घ्यायचे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक सुद्धा होते.यात जहालवादी, मवाळवादी, क्रांतिकारक अशा अनेक विचारधारांचे लोक होते.त्यामुळे आपसात मतभेद अवश्य असायचे परंतु मतभिन्नता नव्हती.त्यामुळे सर्वांचा एकच उद्देश होता तो म्हणजे भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करून स्वतंत्र करने त्यापध्दतीने सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले व भारत १९४७ ला स्वातंत्र्य झाला.यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान होते. सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ मध्ये झाला व त्याचा मृत्यू २६फेब्रुवारी १९६६ ला झाला.आज त्यांचा मृत्यू होऊन ६० वर्षे झालीत आणि भारत स्वतंत्र होऊन ७९ वर्षे झालीत मग आताच राजकीय पुढाऱ्यांना कसे काय आठवले की सावरकरांनी इंग्रजांना मदत केली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा इतिहास महाराष्ट्रातील जनतेला, राजकीय पुढाऱ्यांना, पक्ष-विपक्षांना चांगल्या प्रकारे ग्यात आहे. त्यामुळे बाहेरच्या राजकीय पुढाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जास्त ग्यान देवु नये. कारण स्व.इंदिरा गांधीसह अनेकांनी सावरकरांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर असा अनेकदा केला आहे ही बाब सावरकरांचा विरोध करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे.थोरमहात्मे, क्रांतिकारक, स्वातंतासेनानी किंवा आपले पुर्वज ज्यांच्या कर्तृत्ववामुळे आपण खुला स्वास घेत आहे अशांबद्दल अपशब्द किंवा आक्षेपार्ह विधान निघणार नाही याची काळजी सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी घ्यावी. सरकारला मी आग्रह करेल की स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल किंवा आपल्या पुर्वजांबद्दल यानंतर कोणीही आक्षेपार्ह विधान केले तर त्यावर कठोर कारवाई करावी.सध्या देशात विद्वेषी वक्तव्य देण्याचे प्रकार वाढले आहेत.यामुळे सुप्रीम कोर्टाने दिनांक २८ एप्रिल २०२३ रोज शुक्रवारला सुप्रीम कोर्टाने आदेश काढला की विद्वेषी वक्तव्ये करणारे यांची कोणी तक्रार करेल याची वाट न पाहता राज्यांनी कारवाई करावी.त्या कृतीस विलंब झाला तर तो कोर्टाचा अवमान समजला जाईल असे सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात बजावले आहे.त्यामुळे विद्वेषी वक्तव्ये करणाऱ्यांनी आपल्या जिभेवर आवर घालावा. जोपर्यंत सुर्य -चंद्र-तारे-आकाश-पाताळ आहे तोपर्यंत सावरकरांचे व संपूर्ण देशभक्तांचे नाव देशात स्वाभिमानाने घेतले जाईल.सावरकरांची पुण्यतिथी साजरी करीत असतांना देशवासीयांनी हेही लक्षात ठेवले पाहिजे की आज बदलत्या हवामानामुळे मानव,पशुपक्षी व संपूर्ण जीवजंतू यांचे जगने अत्यंत कठीण झाले आहे.परंतु आपण यावर मात करू शकतो स्वातंत्रवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रासह संपूर्ण देशवासीयांना आग्रहाची विनंती करतो की आजच्या दिवशी प्रत्येक देशभक्तांनी वृक्षलागवडीचा संकल्प करावा व शाळा , महाविद्यालय, शासकीय विभाग, संस्था या सर्वांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली अर्पण करावी.यामुळे आपल्याला झाडाच्या पानात, फुलात, फळात व जळामुळात सावरकरांचे दर्शन अवश्य होईल.स्वातंत्रवीर सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त माझा कोटी कोटी प्रणाम!जय हिंद!
लेखक.
रमेश कृष्णराव लांजेवार ( स्वतंत्र पत्रकार )
मो. नं.९९२१६९०७७९ नागपूर
विश्वभारत News Website