आश्चर्य…सभेच्या विषयसूचितून “डस्ट प्रदुषण” चा मुद्दाच गायब….

आश्चर्य…सभेच्या विषयसूचितून “डस्ट प्रदुषण” चा मुद्दाच गायब….
माणिकगड कंपनी व न.प.च्या मधूर संबंधात जनतेचा जीव धोक्यात.
कोरपना ता.प्र.:-
      गडचांदूर शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या माणिकगड सिमेंट कंपनीतुन वेधडक होत असलेल्या डस्ट प्रदूषणाचा मुद्दा हल्ली ऐरणीवर असून मागील एक वर्षापासून शहरवासी डस्टच्या वर्षावने अक्षरशः त्रस्त झाले आहे.विशेष म्हणजे,डस्ट प्रदूषणाचा सर्वात जास्त फटका येथील साईशांती नगराला बसत आहे.या डस्टमुळे शहरवासीयांना विवीध जीवघेण्या रोगांची लागण होत असतानाच स्थानिक नगरपरिषद नगराध्यक्ष,उपाध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवक निव्वळ बघ्यांची भूमिका वळवत असल्याचे आरोप होत आहे.जनतेच्या आरोग्याशी निगडित डस्ट प्रदूषणाबाबत येत्या सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन बहुमताने मंजूर करा,अशी मागणी साईशांती नगरवासी गेल्या तीन महिन्यापासून नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे करत आहे.मात्र याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप करत याच विषयाला अनुसरून ३० मार्च रोजी पुन्हा  नगराध्यक्ष,उपाध्यक्ष,मुख्याधिकारी तसेच सर्व सभापती,नगरसेवकांना निवेदन देऊन सदर ठराव घेण्याची विनंती वजा मागणी साईशांती नगरातील महिलांनी केली.अन्यथा कोरोनाचे सर्व नियम पाळून सभेच्या दिवशी नगरपरिषदपूढे ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
      दरम्यान येत्या ९ एप्रिल रोजी नगरपरिषदेत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.यात वेगवेगळे एकुण २४ मुद्दे विषयसूचित समाविष्ट करण्यात आले.मात्र विवीध प्रकारच्या रोगांना आमंत्रण देणाऱ्या तसेच जनतेच्या आरोग्याशी निगडित माणिकगड सिमेंट कंपनीतून होत असलेल्या डस्ट प्रदूषणाचा मुख्य मुद्दा विषयसूचितून वगळण्यात आल्याचे दिसत आहे.हे निव्वळ स्थानिक नगरपरिषद सत्ताधारी व माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनातील हितसंबंधांचे फलित असल्याची जळजळीत प्रतिक्रिया डस्टमुळे त्रस्त असलेले नागरिक देताना दिसत आहे.यांच्या या कृत्यामुळेच बिचाऱ्या सर्वसामान्य जनतेचा जीव धोक्यात आल्याचा आरोप होत आहे.विषयसूचित डस्टचा मुद्दा गहाळ झाल्याचे पाहून सोशल मिडियाच्या  माध्यमातुन सुद्धा स्थानिक नगरपरिषद सत्ताधाऱ्यांविरूद्ध संतापाची लाट उसळली असून निषेध व्यक्त होत आहे.नगरपरिषद सत्ताधाऱ्यांना जनतेच्या आरोग्याची काळजी किती ? हे या निमित्ताने सिद्ध होते अशी टीका होत असून यानंतर आता डस्टमुळे त्रस्त झालेले बिचारे साईशांती नगरवासीयांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About Vishwbharat

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते …

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *