चंद्रपूर महानगरपालीकेच्या Aक्शन प्लॅनद्वारे मिळणार लसीकरण मोहीमेस गती

चंद्रपूर महानगरपालीकेच्या aक्शन प्लॅनद्वारे मिळणार लसीकरण मोहीमेस गती
१४ लसीकरण केंद्रांद्वारे ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगट असणा-या
प्रत्येक नागरीकांना लस देण्यास ४५ दिवसांचा कालावधी निश्चित.

चंद्रपूर  – चंद्रपूर महानगरपालीकेद्वारे लसीकरण मोहीमेस गती देण्याच्या उद्देशाने लसीकरण केंद्रांत वाढ करण्यात येणार येणार असुन त्यादृष्टीने एकुण १४ लसीकरण केंद्रे तयार केली जाणार आहेत. चंद्रपुर शहरातील एकुण लोकसंख्या अंदाजे ३,५५,३८६ एवढी असुन, त्यापैकी आजपावेतो २५६४१ नागरीकांना कोविडशिल्ड लस देण्यात आलेली आहे. माहे एप्रिल, २०२१ पासुन ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगट असणा-या प्रत्येक नागरीकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करुन, त्यांना मोफत लस देण्यासाठी चंद्रपुर मनपा प्रयत्नशिल असणार आहे.
मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर श्री. राहुल पावडे, स्थायी समिती सभापती श्री. रवी आसवानी, आयुक्त श्री. राजेश मोहीते यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त श्री. विशाल वाघ यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. आविष्कार खंडारे यांच्यासमवेत यासंबंधीचा Aक्शन प्लॅन तयार केला असुन त्यानुसार चंद्रपुर शहरातील एकुण लोकसंख्या विचारात घेता, त्यापैकी २७% म्हणजेच अंदाजे एकुण ९५९५४ लोकसंख्या ही ४५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगट असणा-या नागरीकांची संख्या ग्राहय धरण्यात आली आहे.
यास्तव, एकुण ९५९५४ नागरीकांना कोवीड- १९ अंतर्गत लसीकरण करण्याकरीता पुढील ४५ दिवसांचा कालावधी निश्‍चित करण्यात आलेला असुन, त्यापैकी आजपावेतो २५६४१ नागरीकांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. म्हणजेच (९५९५४ – २५६४१ = ७०३१३) ७०३१३ नागरीकांचे लसीकरण करणे अद्याप शिल्लक आहे.
सद्यस्थितीत चंद्रपुर मनपाचे एकुण ६ लसीकरण केंद्रे कार्यन्वित असुन, १०० लसीकरण प्रती दिवस / प्रती केंद्र याप्रमाणे दररोज अंदाजे ६०० नागरीकांना कोविडशिल्ड लस देण्यात येत आहे. ७०३१३ नागरीकांना येणा-या पुढील ४५ दिवसांमध्ये लसीकरण करावयाचे असल्यास, अंदाजे १४ लसीकरण केंद्रे कार्यन्वित करणे गरजेचे आहे.
तसेच भविष्यात १८ वर्षे अथवा १३ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगट असणा-या प्रत्येक नागरीकांना लस द्यावयासंबंधी शासनाचे निर्देश आल्यास ही १४ लसीकरण केंद्रे हे त्यापुढील ४५ दिवसांसाठी म्हणजेच, ९० दिवसांसाठी सुरु ठेवावे लागतील. हा अंदाज बघता माहे एप्रिल, २०२१ पासुन सदर केंद्रे कार्यन्वित करण्यास, तसेच त्याकरीता लागणारा मनुष्यबळ यांचे मानधनावर येणाऱ्या खर्चाच्या अनुदानाची मागणी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात आलेली आहे.

 

About Vishwbharat

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते …

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *