Breaking News

कोरोनाच्या सावटात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागात 312 पदे रिक्त

Advertisements

कोरोनाच्या सावटात आरोग्य विभागात 312 पदे रिक्त
चंद्रपूर-
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जिल्ह्यात उद्रेक होत आहे. पण, रिक्त पदांअभावी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तणावात आहे. या विभागात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षय रोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका अशी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम इतर अधिकारी व परिचारिकांना कामाचा ताण सहन करीत अतिरिक्त सेवा द्यावी लागत आहे.येथे मे 2020 मध्ये कोरोनाचा पहिला बाधित रूग्ण आढळून आला होता. त्यानंतर आतापर्यंत 28 हजार 407 बाधितांची नोंद झाली. तर 431 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमण काळात या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागला. त्याला कारण मंजूर 982 पदांपैकी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत.
रिक्त पदांमध्ये प्रामुख्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 1, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी 1, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी 1, जिल्हा क्षयरोग अधिकारी 1, प्रशासकीय अधिकारी 1, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी 1, सांख्यिकी अधिकारी 1, जिल्हा हिवताप अधिकारी 1, जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका 1, सांख्यिकी पर्यवेक्षक 1, जेष्ठ सहायक लेखा 1, जेष्ठ सहायक 1, कनिष्ठ सहायक 1, सांख्यिकी अन्वेषक 1, वाहन चालक 4, औषध निर्माण अधिकारी 10, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 9, आरोग्य सहायक 16, आरोग्य सेवक पुरूष 71, आरोग्य सहायक 8, आरोग्य पर्यवेक्षक 5 अशी पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी गट अ मध्ये 117 पदे मंजूर आहेत. त्यातील 32 पदे भरलेली आहेत. तर 85 पदे रिक्त आहेत. मात्र, करोना संक्रमन बघता 85 पैकी 77 पदे कंत्राटी पध्दतीने आरोग्य अधिकार्‍यांना नियुक्त करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी गट ब ची 7 पदे रिक्त आहेत. तर तालुका आरोग्य अधिकार्‍यांची दोन पदे रिक्त आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी तथा परिचारिका यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

प्रभू श्रीराम पर अभद्र टिप्पणी के खिलाफ रामभक्तों का आंदोलन

  नागपूर,कोराडी। गत 16 अप्रैल की रात किसी अज्ञात तत्वों द्धारा मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम के …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *