मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती माजी महापौर आणि विधान परिषद आमदार संदीप जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. संदीप जोशी यांच्या गाडीवर बाईकस्वार हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या.
सुदैवाने जोशी आणि त्यांचं कुटुंब या हल्ल्यातून सुखरुप बचावले. माजी महापौर आणि विद्यमान आमदार संदीप जोशी यांचेवर १८ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था नागपूरमधील सहाय्यक प्राध्यापक आशिष बढिये व निती कपूर या दोघांनी नियमानुसार संचालकाची परवानगी न घेता गुन्हा स्थळाला भेट दिली होती.
संवेदनशील प्रकरणात यांच्यामुळे अडचण निर्माण झाली. शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेमधील प्राध्यापकांना प्रात्यक्षिक ज्ञान नसल्यामुळे फक्त पुस्तकी ज्ञानावर गुन्हास्थळावरून मुद्देमाल गोळा करता येत नाही. तसेच आशिष बढिये व निती कपूर यांनी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम केलेले नाही. त्यांचे शिक्षण क्षेत्राचे अनुभव हे गुन्हास्थळातील भेटीकरिता नाही, असे असतानाही या दोघांनी गुन्हास्थळाचा भेट दिली, असा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय अन्य आरोपही करण्यात आले असून या प्रकरणाची त्रिस्तरीय समिती चौकशी करणार आहेत. यांच्याविरोधात विभागीय चौकशीसाठी उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. त्यांनी कर्तव्यात कसूर करून शासनाची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार करण्यात आली होती.
काय आहेत आरोप?
तक्रारीनुसार, आशिष बढिये व निती कपूर यांनी प्रत्यक्ष प्रयोगशाळेत काम केलेले नसून त्यांचे शिक्षण क्षेत्राचे अनुभव हे गुन्हास्थळातील भेटीकरिता नाही कारण प्रयोगशाळेतील तज्ञ अधिकारी यांना सुद्धा संबंधित विभागातील पूर्ण अनुभव येण्याकरिता कमीत कमी ६ ते ७ वर्षे लागतात. आशिष बढिये व निती कपूर यांनी शासनाची परवानगी न घेता भारताबाहेर परिषदेस उपस्थित राहतात. दोघ्यांच्या पासपोर्ट तपासणी करण्यात यावी. शासनाची परवानगी न घेता दोघांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.
कार्यालय प्रमुखाची परवानगी न घेता २९ व ३०.०१.२०२४ रोजी किरकोळ रजा टाकून दिनांक २७.०१.२०२४ ते ३०.०१.२०२४ रोजी मुख्यालय सोडून त्रिपुरा येथील एनएफएस च्या परिषदेस उपस्थित राहिले होते. संस्थेतील आयक्यूएसी समन्वयक या पदाचा कार्यभार असताना जाणीवपूर्वक संस्थेचा निकषांमधील रिसर्च संबधित अतिमहत्तवाचा डेटा कार्यभार हस्तांतरण करण्यापूर्वी डीलीट करण्यात आलेला आहे, असे विविध आरोप या दोघांवर करण्यात आले आहेत.