18 वर्षा वरील लसीकरण केंद्र नकोडा तेथे लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावं BRSP चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेश मल्हारी पाईकराव यांचा _नेतृत्वाखाली नितिन अशोक कनाकेB.R.S.P. अध्यक्ष नकोडा यांची मागणी* `
आज दिनांक 6 मे 2021 रोजी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी शाखा घुग्घूस च्या माध्यमातून सरपंच साहेब ग्रामपंचायत नकोडा यांचा मार्फत जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले की, 45 वर्षा वरील लोकांसाठी कोरोना लसीकरण केंद्र नकोडा इथे लावण्यात आले त्या साठी खूप धन्यवाद.तसेच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्ण खूप वाढले आहे आणि कोरोना बधितांची संख्या खूप वाढत आहे त्या मुळे काही कोरोना बाधितांना त्यांचाच घरी प्रतिबंध करून ठेवण्यात येत आल्यामुळे गावातील लोकांचा मनात भीतीचे वातारण पसरलेले आहे म्हणून लवकरात लवकर 18 वर्षा वरील कोरोना लसीकरण केंद्र नकोडा गावात उपलब्ध करून देण्यात यावे.अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी च्या माध्यमातून करण्यात आली आहे.
निवेदन सदर करताना धर्मा कांबळे, किशोर क्षीरसागर, नितिन अशोक कनाके BRSP अध्यक्ष नकोडा