Breaking News

खुशखबर! सिलेंडर दरात मोठी कपात

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीलाच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 32.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलेंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

Advertisements

14.2 किलोचा घरगुती सिलेंडर स्वस्त किंवा महागही झाला नाही. घरगुती सिलेंडर आहे त्याच दराने उपलब्ध आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान, नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisements

आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मुंबईमध्ये 32.50 रुपये, दिल्लीमध्ये 25.50 रुपये, कोलकातामध्ये 36.5 रुपये तर चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये किमतीला मिळेल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मर्यादा-पुरूषोत्तम श्रीराम के साथ झूठ छल कपट? : खामियाजा अयोध्या शीट पर BJP की थू थू

मर्यादा-पुरूषोत्तम श्रीराम के साथ झूठ छल कपट का खामियाजा अयोध्या शीट पर BJP की थू …

जानिए कैसा है पीएम नरेंद्र मोदी का नया कैबिनेट, देखिए पूरी सूचि

जानिए कैसा है पीएम नरेंद्र मोदी का नया कैबिनेट, देखिए पूरी सूचि टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *