Breaking News

सावधान!कोजागरीचे दूध भेसळ तर नाही? कसे ओळखाल

विश्व भारत ऑनलाईन :
कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून चंद्राला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला दुधाची मोठी मागणी असते. अशावेळी दुधात भेसळ करून विक्रीची शक्यता नाकारता येत नाही. अशा भेसळयुक्त दुधात शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आजकाल पॅकेज्ड दुधातही कृत्रिम भेसळ केली जाते. दुधाच्या गुणवत्तेबद्दल घरगुती सोप्या टिप्स वापरून भेसळ कशी ओळखायची हे जाणून घेण्यासाठी वाचा….

हे करा प्रयोग

दुधामध्ये चार थेंब आयोडीनचे टाका आणि दुधाचा रंग जर निळा झाला असेल तर हे भेसळयुक्त दूध आहे हे निष्पन्न होते. जर तुमच्या दुधात भेसळ असेल किंवा त्यात कोणत्याही प्रकारचे सिंथेटिक असेल. तर दुधाचा वास घेऊन तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकता. जर दुधात सिंथेटिकची भेसळ झाली असेल. तर अशा परिस्थितीत, आपण त्याच्या खराब चव आणि वासाने याबद्दल सहजपणे शोधू शकता.

जमिनीवर निशाण सोडणारे दूध भेसळीचे

दुधाचे 2-3 थेंब एका साध्या पृष्ठभागावर टाकून जर दूध हळूहळू सरकले आणि मागे एक निशाण सोडले तर दूध शुद्ध आहे, जर दूध पृष्ठभागावर पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे निशाण सोडत नसल्यास या स्थितीत तुमच्या दुधात भेसळ झाली आहे, असं समजा.

पिवळसर रंग

दूध साठवल्यावर त्याचा रंग बदलत नाही. तर दुसरीकडे भेसळीचे दूध काही काळानंतर पिवळे होते. जेव्हा आपण दूध उकळतो तेव्हा त्याचा रंग बदलत नाही, मात्र भेसळीचे दूध उकळल्यावर ते पिवळे होते. दूध खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. जर भेसळयुक्त दूध आढळले तर अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करा असे आवाहन अधिकारी इम्रान हाश्मी यांनी केले आहे.

About विश्व भारत

Check Also

वात व्याधि अवसाद निवारण के लिए अश्वगंधारिष्ट सिरप के लाभ

वात व्याधि अवसाद निवारण के लिए अश्वगंधारिष्ट सिरप के लाभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

सेहत का खजाना मूंगफली बाजार में आते ही मचा दी धूम

सेहत का खजाना मूंगफली बाजार में आते ही मचा दी धूम? टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *