Breaking News

शिंदे × ठाकरे वाद : पवारांची रणनीती ठाकरेंसाठी आधार? वाचा…

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्याने उद्धव ठाकरे पेचात सापडले आहेत. चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा न्यायिक लढा सुरूच असेल. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असेच वादात सापडले होते. त्यावेळी शरद पवार यांनी कोणते राजकीय डावपेच वापरले होते. त्याचा अभ्यास करावा लागेल. पवारांच्या राजकीय अभ्यासाचा लाभ उद्धव ठाकरेंना होईल का, हे महत्वाचे.

Advertisements

घड्याळचा वाद

घड्याळ चिन्ह आम्हाला मिळावे किंवा गोठवावे, अशी मागणी झाली होती. शेवटी सुनावणी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे शरद पवार यांच्याकडे कायम राहिले व घड्याळ हे चिन्हही राष्ट्रवादीकडे कायम राहिले. तेव्हा शरद पवार यांना पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटनेत अधिक समर्थन असल्याचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केला होता. शिवसेनेत सध्या हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.

संख्या महत्वाची

शिवसेनेप्रमाणेच तेव्हा राष्ट्रवादीत लोकप्रतिनिधी कोणत्या गटाकडे जास्त यावर युक्तिवाद झाला होता. संगमा यांना ईशान्येकडील राज्यांमधील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला होता. तर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील खासदार-आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. निवडणूक आयोगासमोर पवार आणि संगमा गटाने दावे-प्रतिदावे केले होते. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकल्यावर निवडणूक आयोगाने शरद पवार यांना पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधींचा अधिक पाठिंबा असल्याने पक्षावरील त्यांचे नियंत्रण मान्य करीत घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांच्याकडे कायम ठेवले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

देवेंद्र फडणवीस की नितीन गडकरी होणार मुख्यमंत्री?आमदार अपात्र ठरल्यास काय होणार?

सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावलं आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेवर …

भेड़-बकरियां शेर से लड सकती है? CM शिंदे का उद्धव ठाकरे पर पलटवार

  टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक की रिपोर्ट मुंबई ।महाराष्ट्र के मुख्यमंत्री और शिवसेना के नेता एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *