आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना आपलेसे करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाल्याची बातमी होती. मात्र, विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयाकडून अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याला त्यांच्या पत्नीने दुजोरा दिलाय. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
विक्रम गोखले यांना गेल्या काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
विश्वभारत News Website