Breaking News

आजपासून दूध – दही महागले

सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसला आहे. जर तुम्ही दूध आणि दही घेण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मदर डेअरी नंतर अजून एका कंपनीने दुधाचे दर वाढवले आहेत.

कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी ब्रँडचे दूध प्रति लिटर आणि दही प्रति किलो यांच्या दरात 2 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आजपासून हे नवीन दर लागू होणार आहे. विशेष दूध, शुभम, समृद्धी आणि संतृप्ति आणि दही यासह 9 प्रकारच्या दुधाच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.

आता नेमकं किती असेल दर

डबल टोन्ड दुधाचा दर आता 38 रुपये, टोन्ड दूध 39 रुपये, होमोजिनाइज्ड टोन्ड दूध 40 रुपये, होमोजिनाइज्ड गायीचे दूध 44 रुपये, विशेष दूध 45 रुपये, शुभम दूध 45 रुपये आहे. समृद्धी दूध 50 आणि संतृप्त दूध 52 रुपये प्रतिलिटर असेल. नंदिनी दहीची किंमत 47 रुपये असेल.

About विश्व भारत

Check Also

प्रोटीन के मामले में खडा मूंग खाने से 1 महीने में बन जाएगी तगड़ी बॉडी

प्रोटीन के मामले में खडा मूंग खाने से 1 महीने में बन जाएगी तगड़ी बॉडी …

नाक और कान में गुनगुना सरसों का तेल डालने के रामबाण फायदे!

नाक और कान में गुनगुना सरसों का तेल डालने के रामबाण फायदे! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *