चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्याच्या बफरझोनमधील शिवनी व मोहरली वनपरिक्षेत्रात एक वाघ व एका बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. बुधवारी एका वाघीणचा मृत्यू झाला होता.
वनविभागाचे अधिकारी , कर्मचारी गस्त घालत असताना मृतावस्थेत वाघ व बछडा आढळून आले. ताडोबाच्या बफर झोनमधील शिवनी वनपरिक्षेत्रांतर्गत वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचा मृत्यू सुमारे २०-२५ दिवसापूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे.
मृतावस्थेतील वाघ खूप दिवसांपासून त्या ठिकाणी पडून होता. वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांना तो ३० नोव्हेंबर रोजी आढळून आला. वरिष्ठांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. बुधवारी (दि.३०) सांयकाळी शवविच्छेदन होऊ शकले नाही. गुरूवारी वाघाचे घटनास्थळीच दहन करण्यात आले.
✳️दुसरी घटना
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहरली वनपरिक्षेत्रातील आगर्झरी येथे आज सकाळी उघडकीस आली. पट्टेदार वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. तो अंदाजे पाच ते सहा महिन्याचा आहे. अन्य वाघाच्या हल्ल्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.