Breaking News

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचे प्रियकराच्या घरासमोर आंदोलन

Advertisements

एका मुलाने त्याच्या प्रेयसीला लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे प्रेयसी मुलाच्या घरासमोर प्रेयसीने चक्क आंदोलन केलंय.

Advertisements

प्रकरण असे…

Advertisements

झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील असून प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला म्हणून मुलीने प्रियकराच्या घराबाहेर तीन दिवस बसली होती. तरुणीने सांगितले की, ‘सध्या लग्नाला नकार देत असलेला मुलगा आणि ती मागील 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. या मुलीला प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला तरीही तिने हार मानली नाही आणि कडाक्याच्या थंडीत प्रियकराच्या घराबाहेर ठिय्या मारला. 3 दिवस ती प्रियकराच्या घरासमोर बसली होती. अखेर तिच्या या प्रयत्नांना यश आलं आणि रविवारी दोन्हीकडील घरच्यांच्या संमतीने त्यांचे लग्न लावून देण्यात आले.

उत्तम महतो आणि निशा कुमारी असं या घटनेतील प्रेम युगुलाचं नाव आहे. त्यांचा विवाह राजगंज येथील एका मंदिरात पार पडला. महेशपूर गावात राहणारा उत्तम महतो आणि तिचे गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे तरुणीने सांगितले. शिवाय ती धनबाद येथे कॉलेजमध्ये शिकत असताना तिची आणि उत्तमची भेट झाली होती असंही तिने सांगितलं.

निशाने म्हणाली, ‘आमच्या नात्याची दोघांच्या घरच्यांन माहिती होती, उत्तमने तिला लग्न करण्याचे वचन दिले होते. दोघेही एकमेकांच्या कुटुंबाला अनेकदा एकत्र भेटले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाची तारीखही ठरलेली होती पण तारखेच्या 20 दिवस आधी उत्तमने लग्नाला नकार दिला.’ यानंतर निशा हट्टाला पेटली आणि अखेर तिने उत्तमलाही तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सीनियर अधिवक्ता के साथ दुर्व्यवहार पर सुप्रीम कोर्ट सख्त? सरकार को नोटिस जारी! कह दी बड़ी बात

सीनियर अधिवक्ता के साथ दुर्व्यवहार पर सुप्रीम कोर्ट सख्त? सरकार को नोटिस जारी! कह दी …

“सरकार आणि अधिकारी अपयशी ठरत असताना…” : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांचे विधान

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि विदर्भपुत्र भूषण गवई यांचे एक मोठे विधान समोर आले आहे. “सरकार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *