Breaking News

जॉबच्या नावाने लाखोंची फसवणूक ; नागरिकांनी कोणतीही लिंक ओपन करू नये – नागपूर पोलिस

Advertisements

टेलिग्रॅमवर पार्ट टाईम जाॅब देण्याचा मेसेज आला आणि 59 लाखांनी फसवणूक झाली, ही घटना नागपुरात उघडकीस आली आहे.

Advertisements

सायबर क्राईम सेलने नागरिकांनी अशा फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी कोणतीही लिंक ओपन करू नये, असे सेलने कळवले आहे.

Advertisements

काय झाले नेमके?

विलास नगीना मिश्रा (वय 40) हे घरी असताना त्यांच्या मोबाईलमधील टेलिग्रॅम अॅपवर पार्टटाईम जाॅबची ऑफर देणारा मेसेज आला. मिश्रा यांनी पार्टटाईम जाॅब करण्याची तयारी दर्शवल्या नंतर आरोपीने त्यांना विविध टास्क पूर्ण करण्यास सांगितले. 9 एप्रिल 2023 ते 21 जून 2023 या कालावधीत मिश्रा यांनी हे टास्क पूर्ण करीत टास्क प्रमाणे 59 लाख 51 हजार 741रूपये जमा केले. मात्र त्या नंतरही आरोपीने मिश्रा यांना जाॅब दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मिश्रा यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली.

आधुनिक तंत्रज्ञानाचा अजुनही अभाव

शहरातील सायबर सेल दोन पोलिस निरीक्षकांच्या भरोशावर चालतो. त्यामध्ये काम करणारे पोलिस हे तांत्रिक तज्ज्ञ नसल्याने अनेकदा आयटी प्रोफेशनल असलेल्या गुन्हेगारांच्या तुलनेत ते कमी पडतात. विशेष म्हणजे, त्यासाठी लागणारी तांत्रिक यंत्रणा आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञाची या ठिकाणी नेमणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, केवळ काही प्रमाणात प्रशिक्षण घेतलेले आणि त्यात आवड असणारे पोलिस या विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे तपासाला बऱ्याच मर्यादा येतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

होलिका दहन तक पुलिस अलर्ट, अतिरिक्त पुलिस बल तैनात

होलिका दहन तक पुलिस अलर्ट, अतिरिक्त पुलिस बल तैनात   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

…तर तुम्ही वकील राहणार नाही! : असे का म्हणाले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती

‘एआय’ तुमचा वेग वाढवू शकते. पण निर्णयक्षमता, नैतिकता आणि न्यायबुद्धी ही केवळ प्रशिक्षित कायदेतज्ज्ञांची ताकद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *