नागपूरमध्ये 22 सप्टेंबरच्या रात्री जोरदार पावसामुळे शहर पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. कित्येक गुरे पुरात वाहुन गेली आहे. कित्येक नागरिकांच्या गाड्या वाहून गेल्या. तर अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. या पुरात तीन मृत्यू झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. आतापर्यंत 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दुकानांचे जे नुकसान झाले त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत करणार आहोत. तर छोट्या ठेल्यांना 10 हजारांची मदत देणार आहोत. काही ठिकाणी पुल नव्याने बांधणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत दोन मृत्यू झाले असून पुन्हा एक बॉ़डी सापडली आहे. 14 जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शिवाय 10 हजार लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. काही लोकांना बाहेर शिफ्ट करावे लागले आहे. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे करून तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देणार आहोत. त्यासोबत महापालिका गाळ काढण्यास कार्यवाही करणार असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. अतिशय कमी वेळात 109 मिमी पाऊस पडला. 90 टक्के पाऊस दोन तासात पडला. त्यामुळे अंबाझरी ओव्हरफ्लो झाला. त्यातूनच नाग नदी, पिवळी नदीत पूरस्थिती निर्माण झाली.