Breaking News

भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य

Advertisements

नवी दिल्ली : भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर (यूएनएससी) सन 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून आठव्यांदा निवड करण्यात आली. भारताला एकूण 192 वैध मतांपैकी 184 मते मिळाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. त्रिमूर्ती यांनी या विजयाबद्दल माहिती दिली.
दरवर्षी 193 सदस्यांसह युएन जनरल असेंबली दोन वर्षांच्या मुदतीसाठी पाच अस्थायी सदस्यांची निवड करते. तर या परिषदेचे पाच स्थायी सदस्य आहेत, ज्यामध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका या देशांचा समावेश आहे. आशिया पॅसिफिक समूहातील एकमेव उमेदवार असून भारताच्या उमेदवारीचं समर्थन करणाºया 55 देशांमध्ये अफगाणिस्तान, बांग्लादेश, भूतान, चीन, इंडोनेशिया, इराण, जपान, कुवेत, किर्गिझस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, श्रीलंका, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.
यापूर्वी भारत सुरक्षा परिषदेवर सातवेळा सदस्य राहिला आहे. सन सर्वप्रथम1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि शेवटी 2011 -2012 मध्ये सुरक्षा परिषदेवर अस्थायी सदस्य म्हणून स्थान मिळावले आहे.
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात सुरक्षा परिषदेवर निवड होणे ही जागतिक नेतृत्त्वाला प्रेरणा देणारी आहे. भारत एका महत्त्वाच्या वेळी सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला आहे. कोविडदरम्यान आणि नंतरच्या काळात भारत कायम जगाचे नेतृत्व करेल आणि एका चांगल्या बहुपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा देईल, अशी आशा टी.एस. त्रिमूर्ती यांनी व्यक्त केली आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

मतदानावर होणार उष्णतेचा परिणाम? हवामान विभागाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) एप्रिल ते जूनदरम्यान देशातील बहुतांश भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली …

टोलनाके होणार बंद? नवी यंत्रणा कशी असेल?

केंद्र सरकारने पथकर संकलनासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आधारित यंत्रणा आणण्याची योजना आखली आहे. ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *