Breaking News

छत्तीसगड सरकार ‘या’ साठी शेण खरेदी करणार

रायपूर : छत्तीसगड सरकार मोठ्या प्रमाणावर शेण खरेदी करणार असून मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज हरेली सणाच्या मुहूर्तावर गोधन न्याय योजनेला सुरुवात केली आहे. अशाप्रकारचा आगळावेगळा निर्णय घेणारे छत्तीसगड देशातील पहिले राज्य ठरले आहे.
माहितीनुसार, सरकार पशुपालकांकडून 2 रुपये किलो दराने शेण खरेदी करणार आहे. या शेणाच्या मदतीने जैविक खत तयार केले जाणार आहे. पशुपालनाला प्रोत्साहन देणे आणि शेतजमिनीचा कस वाढवणे हे योजनेचे उद्दिष्ट आहे. गोधन न्याय योजनामुळे पर्यावरण सुधारेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता असून रोजगार संधीही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. पशुपालनामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होईल. जैविक खताचा वापर वाढल्याने रासायनिक खतांचा वापर कमी होईल. त्यातून जमिनीचा कस वाढल्याने पीक उत्पादनही वाढेल, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.
शेतकरी व पशुपालकांकडून दोन रुपये प्रतिकिलोवर शेण विकत घेतले जाईल. त्यातून महिला बचत गटांकडून सेंद्रिय खत (कंपोस्ट) तयार केले जाईल. तयार खेत 8 रुपये किलो दराने सरकार खरेदी करणार आहे. खरेदी केलेल्या शेणापासून इतर साहित्य देखील तयार केले जाईल.

About Vishwbharat

Check Also

भारत न सोडणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांवर कोणती कारवाई होणार?

काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग …

पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम

पहलगाम हमले के बाद पहली बार सुप्रीम कोर्ट ने उठाया बड़ा कदम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *