Breaking News

कोणतीही लस ५० टक्केही प्रभावी नाही; WHO ने सांगितले ‘हे’ कारण!

करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. करोनाला अटकाव करणाऱ्या लशीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी ही तिसऱ्या टप्पात पोहचली आहे. तर, रशियाने जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस ‘स्पुटनिक व्ही’ विकसित केल्याचा दावा केला आहे. या दरम्यानच जागतिक आरोग्य संघटनेने लशींबाबत पुन्हा एकदा इशारा दिला आहे. सध्या चाचणी सुरू असलेल्या लशींपैकी एकही लस करोनावर ५० टक्केही प्रभावीही नसल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे. त्याशिवाय, पुढील वर्षांपर्यंत २०२१ पर्यंत जगातील सर्वच नागरिकांना लस मिळेल याचीही शाश्वती नसल्याचे त्यांनी सांगितले.

लस ५० टक्केही प्रभावी नाही!

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरीस यांनी जिनिव्हामध्ये सांगितले की, जगभरात करोनाला अटकाव करणाऱ्या अनेक लशी चाचणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. मात्र, कोणतीही लस पूर्णपणे प्रभावी आहे, असे म्हणता येणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पूर्णपणे या लशी पूर्ण करत नाहीत. त्यामुळे या लशी प्रभावी आहेत असे म्हणता येणार नाही. पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातही व्यापक लशीकरण मोहीम सुरू होईल, असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. चाचणी होत असलेली लस करोनाविरोधात किती सुरक्षित आहे, यावर आम्ही लक्ष देत आहोत. त्यामुळे लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्याला अधिक वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
लस सुरक्षित असल्याच्या खात्रीशिवाय मंजुरी नाही

करोनाला अटकाव करणारी लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याशिवाय जागतिक आरोग्य संघटना या लशीच्या वापराची शिफारस करणार नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. चीन आणि रशियाने आपल्या देशात काही लशींच्या वापरास मंजुरी दिली आहे. या लशींचा वापरही सुरू करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रुयसुस यांनी सांगितले की, लशींचा वापर यशस्वीपणे अनेक दशकांपासून केला जात आहे. पोलिओ निमुर्लनात लशींचा वापर महत्त्वाचा ठरला आहे. जी लस सुरक्षित आणि प्रभावी नसेल त्या लशीची शिफारस करणार नाही असेही त्यांनी सांगितले.
हर्ड इम्युनिटीवर याआधीच WHOने दिलाय इशारा
जागतिक आरोग्य संघटनेचे आपात्कालीन प्रकरणांचे प्रमुख डॉक्टर मायकल रेयान यांनी याआधीच हर्ड इम्युनिटीची अपेक्षा करायला नको असे म्हटले होते. जागतिक लोकसंख्येचा विचार करता आपण अद्यापही विषाणूचा प्रसार रोखता येईल त्या स्थितीच्या जवळपासही नाही. त्यामुळे हर्ड इम्युनिटीची परिस्थिती अद्याप आली नसल्याचे त्यांनी याआधी सांगितले होते. हर्ड इम्युनिटी हा करोनावर मात करण्यासाठीचा पर्याय ठरू शकत नाही. आतापर्यंत करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, सध्या फक्त १० ते २० टक्के लोकांमध्येच अॅण्टीबॉडीज आहेत, ज्या हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यास मदत करू शकतील. मात्र, इतक्या कमी अॅण्टीबॉडीजने हर्ड इम्यूनिटीचे उद्दिष्ट साधता येणार नाही.
लशीद्वारे हर्ड इम्युनिटी शक्य!

बहुतांशी शास्त्रज्ञांच्या मते विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कमीत कमी ७० टक्के लोकसंख्येत विषाणूला अटकाव करणाऱ्या अॅण्टीबॉडीज असणे आवश्यक आहे. मात्र, काही तज्ञांनुसार जर निम्म्या लोकसंख्येतही करोनाविरोधात लढण्याची रोग प्रतिकारक क्षमता असल्यास तर एक बचावात्मक प्रभाव निर्माण होऊ शकतो. करोनाला मात देण्यासाठी लस हाच सध्या पर्याय आहे. त्याशिवाय जगातील ५० टक्क्यांहून अधिकजणांना लशीकरणाच्या मोहिमेत सामावून घेण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे वरिष्ठ सल्लागार डॉ. ब्रूस एलवार्ड यांनी सांगितले.

About Vishwbharat

Check Also

नफरत फैलाते है न्यूज़ चैनल, एंकरों के खिलाफ कार्रवाई हो, भारत में ‘स्वतंत्र प्रेस’ की जरूरत: सुप्रीम कोर्ट

नफरत फैलाते है न्यूज़ चैनल, एंकरों के खिलाफ कार्रवाई हो, भारत में ‘स्वतंत्र प्रेस’ की …

गंदा पानी पीकर गुजारा कर रहे राष्ट्रपति की ‘दत्तक संतान : कोसों दूर से भरकर लाते हैं मटके

गंदा पानी पीकर गुजारा कर रहे राष्ट्रपति की ‘दत्तक संतान? कोसों दूर से भरकर लाते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *