🔹खाजमियाँ पठाण यांच्या वंचित बहुजन आघाडीतील प्रवेशामुळे अंबाजोगाईतील पाटोदा सर्कलमध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीत येणार वेग पठाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन.
अंबाजोगाई(दि.5सप्टेंबर):-आज दिनांक 05 सप्टेंबर 2020 रोजी पाटोदा जिल्हा परिषद सर्कल मधील शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यासह खाजामियाँ पठाण व राष्ट्रीय समाज पक्षाचे घाटनांदूर सर्कलचे तुकाराम देवळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दयानंद भालेराव, सुनिल सावंत यांच्यासह इतर अलुतेदार बलुतेदार समूहातील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिलभाऊ डोंगरे यांच्या उपस्थितीत मोरेवाडी येथील लोकसेवा हाॅटेल येथे जाहीर प्रवेश केला .
यावेळी जिल्हामहासचिव मिलींद घाडगे , जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजीत रोडे , विधी सल्लागार व जेष्ठ मार्गदर्शक अॅड. सतिष काळम पाटील सर , ऍड सुभाष जाधव , विद्रोही चे प्रमुख तथा वंचित बहुजन आघाडी चे युवा नेतृत्व शैलेशभाऊ कांबळे , वंचित बहुजन आघाडी चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष संजय तेलंग, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशांतजी धावारे , ज्येष्ठ नेते मारुती साळवे , मारुती सरवदे , वंचित बहुजन आघाडीचे अमोलदादा हातांगळे , अनिलजी कांबळे , लखन वैद्य , नितीन सरवदे , अजय जोगदंड , चंद्रकांत सरवदे , रत्नदिप सरवदे व बाबासाहेब मस्के यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला .
या प्रवेशा नंतर पाटोदा जिल्हा परिषद सर्कलसह पंचायत समिती पाटोदा व राडी या परिसरामध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या ताकदीने पुढे येत असल्याचे समिकरण जुळत आहे . यामुळे प्रस्थापित पक्षांना मोठा हादरा बसला असून वंचित बहुजन आघाडीचे प्राबल्य वाढत आहे भविष्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वंचीत बहुजन आघाडी ने जोरदार तयारी सुरू केल्याचे स्पष्ट चिन्ह दिसू लागल्याने प्रस्थापित पक्षांचे धाबे दणाणले आहेत …!