✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट
हिंदु संरक्षण आणि अखंड भारतासाठी अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आखड्यात उतरली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगला असताना आता हिंदू महासभेने निवडणूक मैदानात उडी मारली आहे. अखिल भारत हिंदू महासभेकडून उमेदवार मैदानात उतरविल्याने निवडणुकीत आणखी रंगत येणार आहे.
अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,हिंदू एकता अलीकडच्या काळात धोक्यात आलेली आहे. हिंदुवर भ्याड हल्ले झालेले आहेत. हिंदूमध्ये असुरक्षितता आहे. हिंदूंच्या कल्याणासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असं मत त्यांनी दिलं.
आम्ही राज्यातील सर्वत्र 288 मतदार संघात आपले उमेदवार उभे करुन हिंदू बचाव, देश बचावचा नारा देणार असल्याचे कारेमोरे यांनी सांगितले.