Breaking News

गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण

Advertisements

भारतातील रुग्णसंख्या ४४ लाखांच्या वर

भारतातली करोनाबाधित रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात देशात ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यामध्ये ९ लाख १९ हजार १८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर घरी सोडवण्यात आलं आहे. दरम्यान करोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Advertisements

दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २४ तासांत ३२५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (१९.८१ टक्के) जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सर्वाधिक ६५ हजार ३६१ करोनाबाधित पुणे जिल्ह्य़ात आहेत.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

हिंदू महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष मुन्ना कुमार शर्मा की मणिपूर के मैतेई हिंदू समुदाय सें बैठक

नई दिल्ली स्थित मंदिर मार्गपर अखिल भारत हिन्दू महासभा के मुख्यालय हिन्दू महासभा भवन में …

कोरोना पेक्षा भयंकर व्हायरस भारतात आलाय : अनेकांचा मृत्यू, अखेर मिनी लॉकडाऊन

कोरोनामुळे 2020 आणि 2021 ही 2 वर्ष भारतासह जगासाठी आव्हानात्मक होती. कोरोनामुळे या 2 वर्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *