Breaking News

Golden Arrows: आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले, राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात

Advertisements

पूर्व लडाखमध्ये भारत व चीन यांच्यात सीमेवरील तणाव वाढला असतानाच, अंबाला हवाई तळावर गुरुवारी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा भारतीय हवाई दलात औपचारिकरीत्या समावेश केला जाणार आहे.राफेल’च्या समावेशाबरोबरच, पारंपरिक सर्वधर्म पूजा, राफेल आणि तेजस विमानांसह ‘सारंग हवाई कसरत चमूचे’ हवाई प्रदर्शन यांचा कार्यक्रमात समावेश असेल.

Advertisements

हा कार्यक्रम हवाई दलाच्या इतिहासातील ‘अतिशय महत्त्वाचा मैलाचा दगड’ ठरेल, असे हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. फ्रान्सच्या ‘दसॉल्त अ‍ॅव्हिएशन’ कंपनीने तयार केलेली राफेल लढाऊ विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले यांसाठी प्रसिद्ध आहेत.

Advertisements

राफेल विमानांचा हवाई दलाच्या १७व्या स्क्वाड्रनमध्ये समारंभपूर्वक समावेश होण्यापूर्वी राफेलच्या ताफ्याला पाण्याच्या तोफांची (वॉटर कॅनन) पारंपरिक सलामी दिली जाईल, असे वायुदलाचे प्रवक्ते विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी सांगितले. ५९ हजार कोटी रुपये किमतीची ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारताने फ्रान्सशी आंतर-सरकार करार केल्यानंतर सुमारे ४ वर्षांनी पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २९ जुलैला भारतात पोहोचली होती.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, त्यांचे फ्रान्समधील समपदस्थ फ्लोरेन्स पार्ली, संरक्षण दले प्रमुख जनरल बिपिन रावत, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया व संरक्षण सचिव अजय कुमार यांच्यासह अनेक मान्यवर व्यक्ती या कार्यक्रमात उपस्थित राहतील. या समारंभात सहभागी होणाऱ्या फ्रेंच शिष्टमंडळात फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनाइन, फ्रान्सच्या वायुसेनेचे उपप्रमुख एअर जनरल एरिक ऑटेलेट, दसॉल्त अ‍ॅव्हिएशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर आणि क्षेपणास्त्र उत्पादक कंपनी एमबीडीएचे सीईओ एरिक बेरांजर यांचा समावेश असेल.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

टोलनाके होणार बंद? नवी यंत्रणा कशी असेल?

केंद्र सरकारने पथकर संकलनासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आधारित यंत्रणा आणण्याची योजना आखली आहे. ही …

सीनियर अधिवक्ता के साथ दुर्व्यवहार पर सुप्रीम कोर्ट सख्त? सरकार को नोटिस जारी! कह दी बड़ी बात

सीनियर अधिवक्ता के साथ दुर्व्यवहार पर सुप्रीम कोर्ट सख्त? सरकार को नोटिस जारी! कह दी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *