Breaking News

खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर ,खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना

खासगी रुग्णालयात आजाराच्या अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या : खासदार बाळू धानोरकर 

खासदारांनी दिल्या लोकसभेत राष्ट्रीय आयोग बिल २०२० वर लोकाभिमुख सूचना 

चंद्रपूर :  नागरिक आणि रुग्ण हे महत्वाचे नाते आहे. भारतातील शेवटच्या वर्गाला आरोग्य व्यवस्था माफक दरात मिळावी, इतर देशाच्या तुलनेत भारताच्या हेल्थ बजेट वाढवावा, भारतात १३४२ रुग्णाच्या मागे एक डॉक्टर आहेत, त्यामुळे ती संख्या वाढवावी, त्यासोबतच खासगी रुग्णालयात रोगाच्या उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च घेण्यात येतो.  त्यामुळे शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे देशातील प्रत्येक खासगी रुग्णालयात रोगाचा अनुषंगाने उपचाराचा खर्च घ्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. ते  लोकसभेत राष्ट्रीय आयोग २०२०  या बिलावर बोलत होते.
                          भारतात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग आहेत. आता देखील ग्रामीण भागापर्यंत आरोग्य व्यवस्था पोहचलेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्हा रुग्णालयावर भार येत असतो. देशात ५९ टक्के रेडिओग्राफर चा तुटवडा आहे.  त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पॅथॉलॉजी लॅब नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना शहरात यावं लागते त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. २०१९ मध्ये भारत मिशन पब्लिक हेल्थ केअर वर १.२८ टक्के खर्च करण्यात आला आहे. इंडोनेशिया आणि श्रीलंका या देशाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे बजेट  मध्ये आरोग्यावर भरीव तरतूद करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
                         समाजाच्या सर्वात शेवटच्या वर्गात जाऊन आरोग्य कर्मचारी सेवा देत असतात. कोरोना काळात तुलनात्मक विचार केल्यात सर्वात जास्त काम यांनी केलं आहे. त्यामुळे या बिलात त्यांच्यासाठी मोठी तरतूद करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. आरोग्य व्यवस्थेत काही तक्रारी झाल्यास ५० हजार दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. ती रक्कम वाढविण्याची व कारवाईत सुधारणा करण्याची महत्वाची सूचना त्यांनी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील पॅथॉलॉजी लॅब ची संख्या वाढवा 
  थेलेसेमिया साठी एच. एल. ए व इतर मोठ्या आजारांसाठी NAT टेस्ट सुविधा देण्याची लोकसभेत मागणी
चंद्रपूर :  चंद्रपूर – वाणी-  आर्णी लोकसभा क्षेत्रातील आरोग्य विषयक समस्यांवर लोकसभेत बोलताना खासदार बाळू धानोरकर यांनी थॅलेसिमिया   रुग्णांसाठी एच. एल. ए टायपिंग टेस्ट थॅलेसिमिया नोंदणी झालेल्या ६५ रुग्णांसाठी ल्युकोसाइट फिटर टेस्ट, एच. आय. व्ही, एच बी. हेपाटायटीस बी. सी टेस्ट या आजाराच्या तपासणीसाठी सध्या एलिसा टेस्ट असून हि चार ते आठ आठवड्याने रीपोट मोडणारी वेळ कडू पद्धत असल्याने NAT न्यूक्लिएफ ऍसिड टेस्ट ची व्यवस्था  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
              चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी व कामगार वर्ग आहे. जिल्ह्यात सिकलसेल,  Thalassemia या रोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. ग्रामीण भागात पॅथॉलॉजी लॅब नसल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात यावं लागत. त्यांना वेळ व पैशाची खर्च करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामीण भागात हि सुविधा उपलब्ध करून देण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य मंत्र्यांना केली.

About Vishwbharat

Check Also

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर …

रुग्णालयात आग : नर्सची हायकोर्टात याचिका

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे लागलेल्या भीषण आगीत ११ बालकांचा दूर्वैवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *